
Bonus Share News | स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांसाठी एक खुशखबर आली आहे. कारण कोठारी प्रोडक्ट्स लिमिटेड कंपनीने शेअरधारकांसाठी 1:1 प्रमाणात बोनस शेअर जाहीर केली आहेत. कोठारी प्रोडक्ट्स लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंजला फायलिंगमार्फत माहिती दिली आहे. त्यानंतर, सोमवारी शेअर्स 7.4 टक्क्यांनी वाढून 209.70 रुपयांवर पोहोचले होते. मंगळवार, 31 डिसेंबर 2024 रोजी कोठारी प्रोडक्ट्स शेअर 0.36 टक्क्यांनी घसरून 198.16 रुपयांवर पोहोचला होता.
कंपनीने काय माहिती दिली
कोठारी प्रोडक्ट्स कंपनीने स्टॉक एक्सचेंजला फायलिंगमार्फत सांगितले की, ‘कोठारी प्रोडक्ट्स कंपनी भागधारकांना सूचित करू इच्छितो की, कोठारी प्रोडक्ट्स लिमिटेड कंपनी कंपनीच्या संचालक मंडळाने शेअरधारकांना एका शेअरवर एक शेअर बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कोठारी प्रोडक्ट्स कंपनीच्या भागधारकांच्या मान्यतेच्या अधीन आहे.
बोनस शेअर रेकॉर्ड तारीख
कोठारी प्रोडक्ट्स लिमिटेड कंपनी संचालक मंडळाकडून बोनस शेअरसाठी रेकॉर्ड तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. रेकॉर्ड तारीखेपर्यंत ज्या गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात कोठारी प्रोडक्ट्स कंपनीचे शेअर्स असतील त्यांच्या खात्यात हे बोनस शेअर्स जमा होईल. मात्र हे बोनस शेअर 12 मार्च 2025 पर्यंत शेअरधारकांच्या खात्यात जमा केले जातील अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
कोठारी प्रोडक्ट्स लिमिटेड कंपनीच्या या निर्णयानंतर बोनस शेअर्ससाठी आर्थिक नियोजनासाठी 29.84 कोटींचे भांडवल आवश्यक असेल. तसेच अधिकृत शेअर्सचे एकूण भांडवल 31.50 कोटी रुपयांनी वाढून 61.50 कोटी इतके होईल.
कोठारी प्रोडक्ट्स शेअरने किती परतावा दिला
कोठारी प्रोडक्ट्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना 58.55 टक्के परतावा दिला आहे. गेल्या 5 वर्षात कोठारी प्रोडक्ट्स शेअरने गुंतवणूकदारांना 223.43 टक्के परतावा दिला आहे. कोठारी प्रोडक्ट्स कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 591 कोटी रुपये आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.