
Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. अनुप इंजिनिअरिंग कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ( अनुप इंजिनिअरिंग कंपनी अंश )
नुकताच अनुप इंजिनिअरिंग कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान पात्र गुंतवणुकदारांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस इक्विटी शेअर्स वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. आज शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी अनुप इंजिनिअरिंग स्टॉक 0.51 टक्के वाढीसह 3,158.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
अनुप इंजिनिअरिंग कंपनीने स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, बोनस शेअर्सची पात्रता निश्चित करण्यासाठीची रेकॉर्ड तारीख योग्य वेळी कळवली जाईल. बोनस शेअर्स जारी करण्याच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीपूर्वी अनुप इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 9 टक्के घसरणीसह 3000.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र बोनस शेअर्सची घोषणा झाल्यावर हा स्टॉक 1 टक्के वाढीसह 3324.35 रुपये किमतीवर पोहचला होता.
अनुप इंजिनिअरिंग ही कंपनी पहिल्यांदाच बोनस शेअर्सचे वाटप करत आहे. यापूर्वी ही कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना नियमित लाभांश वाटप करत होती. 2019, 2020 आणि 2021 मध्ये अनुप इंजिनिअरिंग कंपनीने प्रति शेअर 7 रुपये लाभांश वाटप केला होता.
2022 मध्ये या कंपनीने प्रति शेअर 8 रुपये लाभांश वाटप केला होता. तर जुलै 2023 मध्ये या कंपनीने आपल्या शेअरधारकांना 15 रुपये लाभांश वाटप केला होता. मागील आठवड्यात अनुप इंजिनिअरिंग कंपनीने माहिती दिली की, त्यांनी मेबेल इंजिनिअरिंग कंपनीचे अधिग्रहण 33 कोटी रुपयेमध्ये केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.