
Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट लाभ मिळवू इच्छित असाल तर तुम्ही मारुती इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स खरेदी केले पाहिजे. या कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 22 जून रोजी आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत मारुती इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट लाभ देण्याचा निर्णय घेऊ शकते. आज गुरूवार दिनांक 6 जून 2024 रोजी मारुती इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 16.81 टक्के वाढीसह 217.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मारुती इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे. या कंपनीने पूर्वी कधीही स्टॉक स्प्लिट केलेले नाही. कंपनीने बोनस इश्यू आणि स्टॉक स्प्लिट या दोन्हीसाठी रेकॉर्ड डेट अद्याप जाहीर केलेली नाही. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 17 टक्के वाढीसह 188 रुपये किमतीवर पोहचले होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 199 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 99 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 233.06 कोटी रुपये आहे.
मारुती इन्फ्रा ही कंपनी मुख्यतः ईडब्ल्यूएस गृहनिर्माण प्रकल्प आणि शहरी पायाभूत सुविधांच्या बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी आहे. अहमदाबादस्थित या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये व्यावसायिक आणि निवासी अशा दोन्ही प्रकल्पांचा समावेश होतो. सध्या या कंपनीचे 207.25 कोटी रुपये मूल्याचे काम निर्माणाधिन आहेत. हे प्रकल्प पुढील दोन वर्षांत पूर्ण केले जातील.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.