
Bonus Share News | एसबीसी एक्सपोर्ट्स लिमिटेड कंपनी शेअरची किंमत सध्या अवघी 22 रुपये आहे. 26 नोव्हेंबर 2021 रोजी एसबीसी एक्सपोर्ट्स कंपनी शेअर 7.56 रुपयांवर ट्रेड करत होता. एसबीसी एक्सपोर्ट्स लिमिटेड कंपनीने आता फ्री बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. एसबीसी एक्सपोर्ट्स कंपनीच्या वतीने 2 शेअरवर 1 फ्री शेअर बोनस दिला जाणार आहे. विशेष म्हणजे ही कंपनी तिसऱ्यांदा बोनस शेअर्स देणार आहे.
2 शेअर्सवर 1 फ्री शेअर मिळणार
एसबीसी एक्सपोर्ट्स लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, ‘एसबीसी एक्सपोर्ट्स कंपनीकडून 1 रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या 2 शेअर्सवर 1 फ्री बोनस शेअर दिला जाईल. मात्र एसबीसी एक्सपोर्ट्स कंपनीने अद्याप रेकॉर्ड तारीख जाहीर केलेली नाही. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात रेकॉर्ड तारीखपूर्वी एसबीसी एक्सपोर्ट्स कंपनीचे २ शेअर्स असतील त्यांना १ फ्री बोनस शेअर दिला जाईल. कंपनी फ्री बोनस शेअर देण्याची प्रक्रिया 2 महिन्यांत पूर्ण करेल अशी माहिती दिली आहे.
कंपनीचे तिमाही निकाल
डिसेंबर तिमाहीत एसबीसी एक्सपोर्ट लिमिटेड कंपनीची निव्वळ विक्री ५०.०२ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. वार्षिक आधारावर एसबीसी एक्सपोर्ट कंपनीने निव्वळ विक्रीत ४ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत एसबीसी एक्सपोर्ट कंपनीची निव्वळ विक्री ४७.८१ कोटी रुपये होती. तसेच कंपनीचा निव्वळ नफ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत १५.३९ टक्क्यांनी वाढ होऊन तो ३.२७ कोटी रुपयांवर पोहोचला होता.
शेअरमध्ये आज 4 टक्क्यांची घसरण
सोमवार, 27 जानेवारी 2025 रोजी एसबीसी एक्सपोर्ट शेअर 4.30 टक्क्यांनी घसरून 22.70 रुपयांवर पोहोचला होता. मागील पाच एसबीसी एक्सपोर्ट शेअरने 200.26 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा दिला आहे. मात्र YTD आधारावर शेअर 16.54 टक्क्यांनी घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.