
Bonus Shares | अल्फालॉजिक इंडस्ट्रीज या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सने सूचीबद्ध झाल्यापासून आपल्या गुंतवणुकदारांना जोरदार कमाई करून दिली आहे. जुलै 2023 मध्ये या कंपनीचे शेअर्स 96 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. मागील 4 महिन्यांत अल्फालॉजिक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 355.30 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. | Alphalogic Industries Share Price
अल्फालॉजिक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्स मागील 4 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 269 टक्के परतावा कमावून दिला आहे. आता अल्फालॉजिक इंडस्ट्रीज कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी अल्फालॉजिक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के घसरणीसह 168.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
अल्फालॉजिक इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख म्हणून 1 डिसेंबर 2023 हा दिवस निश्चित केला होता. अल्फालॉजिक इंडस्ट्रीज कंपनी आपल्या शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे.
18 ऑक्टोबर 2023 रोजी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. कंपनीने यापूर्वी 24 नोव्हेंबर 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला होता. त्यांनतर कंपनीने रेकॉर्ड तारीख बदलून 1 डिसेंबर 2023 केली होती.
अल्फालॉजिक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स आपल्या इश्यू किमतीच्या तुलनेत 269 टक्के वाढले आहेत. अल्फालॉजिक इंडस्ट्रीज कंपनीचा IPO 3 जुलै 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. आणि 6 जुलै 2023 रोजी IPO ची अंतिम तारीख होती.
अल्फालॉजिक इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 96 रुपये निश्चित केली होती. 14 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 96 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. 30 नोव्हेंबर 2023 रोजी अल्फालॉजिक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 355.30 रुपये किमतीवर पोहोचले होते. या कंपनीचा IPO एकूण 5.34 पट अधिक सबस्क्राइब झाला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.