 
						Bonus Shares | गुजरात थेमिस बायोसिन या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 700 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर 0.50 टक्क्यांच्या घसरणीसह 404.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 6 मे 2024 रोजी गुजरात थेमिस बायोसिन स्टॉक 2.48 टक्के वाढीसह 414.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( गुजरात थेमिस बायोसिन कंपनी अंश )
गुजरात थेमिस बायोसिन या कंपनीची स्थापना 1981 साली झाली होती. नंतर जून 1991 मध्ये गुजरात थेमिस बायोसिन कंपनीला साऊथ कोरियास्थित युहान ग्रुप आणि फार्मास्युटिकल बिझनेस ग्रुप (इंडिया) लिमिटेड यांनी खरेदी केले होते. त्यानंतर फार्मास्युटिकल बिझनेस ग्रुप (इंडिया) लिमिटेड कंपनीने गुजरात थेमिस बायोसिन कंपनीचे पूर्ण अधिग्रहण केले. त्यानंतर गुजरात थेमिस बायोसिन या कंपनीने साऊथ कोरियाच्या युहान कॉर्पोरेशन सोबत टेक्नॉलॉजी क्षेत्रात प्रवेश केला. आणि त्यानी एकत्रितपणे रिफाम्पिसिन या क्षयरोगविरोधी औषधचे उत्पादन घ्यायला सुरुवात केली. अशा प्रकारचे औषध तयार करणारी ही भारतातील पहिली कंपनी होती.
गुजरात थेमिस बायोसिन कंपनीने 14 मे रोजी आपल्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेऊ शकते. ही कंपनी 2020 पासून सातत्याने गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करत आहे. या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना आतापर्यंत वाटप केलेला सर्वाधिक लाभांश दर 4 रुपये होता.
मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत गुजरात थेमिस बायोसिन स्टॉक 700 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. या कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 70.86 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		