
Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खूशखबर आहे. ईस्टर्न लॉजिका इन्फोवे लिमिटेड कंपनी आपल्या विद्यमान पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. या कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना एका शेअरवर 5 बोनस शेअर्स मोफत देण्याची घोषणा केली आहे. Logica Infoway Share Price
ईस्टर्न लॉजिका इन्फोवे लिमिटेड कंपनी पहिल्यांदाच बोनस शेअर्स वाटप करणार आहे. आज मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी ईस्टर्न लॉजिका इन्फोवे लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.69 टक्के वाढीसह 1,560 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ईस्टर्न लॉजिका इन्फोवे लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, चालू आठवड्यात कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या एका शेअरवर 5 बोनस शेअर्स वाटप करणार आहे. या कंपनीने रेकॉर्ड तारीख म्हणून 21 फेब्रुवारी 2024 हा दिवस निश्चित केला आहे. म्हणजेच या तारखेला ज्या गुंतवणूकदारांचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये असेल, त्यांना कंपनी मोफत बोनस वाटप करेल.
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ईस्टर्न लॉजिका इन्फोवे लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.70 टक्क्यांच्या वाढीसह 1487 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 14 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 251 टक्के नफा कमावून दिला आहे.
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 550 टक्क्यांनी वाढली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1501 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 195.10 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 423.89 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.