
Bonus Shares | लॉरेन्झिनी ॲपेरेल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 86 रुपयेवरून वाढून 452 रुपये किमतीवर पोहचले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी एका वर्षापुर्वी लॉरेन्झिनी ॲपेरेल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 425 टक्के वाढले आहे. Lorenzini Apparels Share Price
आता ही कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट लाभ देणार आहे. शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी लॉरेन्झिनी ॲपेरेल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.68 टक्के वाढीसह 437 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
लॉरेन्झिनी ॲपेरेल्स लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना 11 शेअर्सवर 6 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. यासह कंपनीने आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
लॉरेन्झिनी ॲपेरेल्स लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट लाभ देण्याची घोषणा 12 फेब्रुवारी 2024 रोजी केली होती. कंपनीने अद्याप बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड डेट जाहीर केली नाहीये. मागील 6 महिन्यांत लॉरेन्झिनी ॲपेरेल्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 45 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.