 
						Bonus Shares | पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स लिमिटेड या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरधारकांना जबरदस्त फायदा मिळणार आहे. पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स लिमिटेड कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या शेअर धारकांना 6:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करणार आहे. म्हणजे कंपनी एका शेअरवर 6 बोनस शेअर्स देणार आहे. Pooja Entertainment And Films Share Price
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 371 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स लिमिटेड स्टॉक 1.99 टक्के वाढीसह 378.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सेबीच्या नियमांनुसार पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स लिमिटेड कंपनीने शेअर धारकांची पात्रता सुनिश्चित करण्यासाठी शनिवार दिनांक 09 डिसेंबर 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहिती कंपनीने कळवले आहे की, पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या पात्र शेअर धारकांना 6:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 120 टक्क्यांनी वाढली आहे.
पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स लिमिटेड कंपनीची स्थापना वाशू भगनानी यांनी 1986 साली केली होती. ही कंपनी सिनेमा बनवण्याचे आणि वितरक फर्म म्हणून व्यवसाय करते. या कंपनीचे मुख्यालय मुंबई येथे स्थित आहे. पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स लिमिटेड कंपनीने 30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीमध्ये 9.95 कोटी रुपये कमाई केली होती. तर 30 सप्टेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीने 14.64 कोटी रुपये कमाई केली होती.
वार्षिक आधारावर कंपनीच्या कमाईमध्ये 47.11 टक्के वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स लिमिटेड कंपनीने 0.31 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जो मागील वर्षीच्या तुलनेत 29.03 टक्के कमी झाला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		