 
						Bonus Shares | सालासर टेक्नो इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंदीच्या काळात देखील तेजीत धावत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. मात्र सालासर टेक्नो इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर अफाट तेजीत वाढत होते. काल सालासर टेक्नो इंजिनिअरिंग स्टॉक 18 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. Salasar Techno Share Price
मागील एका आठवड्यात सालासर टेक्नो इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 67 टक्के परतावा दिला आहे. आज बुधवार दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी सालासर टेक्नो इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 0.42 टक्के वाढीसह 108.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
नुकताच सालासर टेक्नो इंजिनिअरिंग कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 1 शेअरवर 4 बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. 20 जानेवारी 2024 रोजी सालासर टेक्नो इंजिनिअरिंग कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत कंपनीच्या संचालकांनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना एका शेअरवर 1 रुपये दर्शनी मुल्य असलेले 4 बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने बोनस शेअर वाटप करण्यासाठी रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे.
सालासर टेक्नो इंजिनिअरिंग कंपनीच्या संचालकांनी बोनस शेअर्स वाटप करण्यासाठी 1 फेब्रुवारी 2024 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. 25 जानेवारी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनी भांडवल उभारणीबाबत निर्णय घेणार आहे.
सकारात्मक बातम्यांच्या पार्श्वभूमीवर सालासर टेक्नो इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये 18 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली होती. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 112.23 रुपये किमतीवर पोहचले होते. 17 जानेवारी 2024 पासून आतापर्यंत या मल्टीबॅगर स्टॉकची किंमत 66 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. मागील 6 महिन्यांत सालासर टेक्नो इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 110 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 36 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		