
Bonus Shares | स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीने नुकताच बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर मागील आठवड्यात शुक्रवारी स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 66.37 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. गुरुवारच्या तुलनेत या कंपनीच्या शेअरमध्ये 2 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. Standard Capital Markets Share Price
स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 9.59 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 600 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. तर 96 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीच्या 31 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. आज सोमवार दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 66.37 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
रेकॉर्ड तारीख :
स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनी सेबीला कळवले की, कंपनीने आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट वाटप करण्यासाठी पात्रता निश्चित करण्याच्या उद्देशाने रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. ज्या लोकांकडे 29 डिसेंबर 2023 रोजी पर्यंत स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स असतील त्यांना कंपनी बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा लाभ देईल. सोमवार दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी कंपनीने मंजुरीसाठी असाधारण सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे.
विभाजनाचे तपशील :
नोव्हेंबर 2023 मध्ये स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनीच्या संचालक मंडळाने 1:10 या प्रमाणात स्टॉक विभाजनाला मंजुरी दिली होती. म्हणजेच ही कंपनी आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभाजित करणार आहे. यासह कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या पात्र शेअरधारकांना 2 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती.
कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदाराला रेकॉर्ड तारखेच्या दिवशी एका शेअरवर दोन बोनस शेअर्स देणार आहे. स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीची स्थापना 1987 साली झाली होती. ही कंपनी मुख्यतः नॉन-बँकिंग आर्थिक क्षेत्रात व्यवसाय करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.