 
						Bonus Shares | टायटन इंटेक ही आयटी कंपनी आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. नुकताच या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 3:5 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक 5 शेअर्सवर 3 बोनस शेअर्स देणार आहे. कंपनीने बोनस शेअर्सची पात्रता निश्चित करण्यासाठी 17 मे 2024 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला आहे. ( टायटन इंटेक कंपनी अंश )
मागील आठवड्यात शुक्रवारी 10 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 95.83 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 13 मे 2024 रोजी टायटन इंटेक कंपनीचे शेअर्स 2.06 टक्के वाढीसह 97.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
टायटन इंटेक कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 113 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 38.60 रुपये होती. मागील 4 वर्षांत टायटन इंटेक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3193 टक्के परतावा कमावून दिला आहे. 17 मे 2020 रोजी टायटन इंटेक कंपनीचे शेअर्स 2.91 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 10 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 95.83 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 323 टक्के परतावा कमावून दिला आहे. 6 मे 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 22.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 76 टक्के वाढली आहे. 11 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 54.29 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 60.01 रुपयेवरून वाढून 95 रुपये किमतीवर पोहचले होते. 2024 यावर्षात टायटन इंटेक कंपनीच्या शेअर्सची किंमत 59 टक्के वाढली आहे.
मागील 9 महिन्यांत टायटन इंटेक स्टॉक 123 टक्के मजबूत झाला आहे. या काळात शेअर्स 43 रुपयेवरून वाढून 95.80 रुपये किमतीवर पोहोचले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		