Brightcom Group Share Price | स्वस्त झालेल्या ब्राइटकॉम ग्रुप शेअरमध्ये नेमकं चाललंय काय? 1 महिन्यात 100.49% परतावा, फायदा घावा का?

Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप या डिजिटल मार्केटिंग कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा अप्पर सर्किट तोडत आहेत. ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून सतत अपर सर्किटमध्ये ट्रेड करत आहेत.

ब्राइटकॉम ग्रुप शेअरची 52 आठवड्यांची पातळी

या कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 2 जुन 2023 रोजी च्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के अप्पर सर्किटसह 20.61 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 9.27 रुपये होती. तर ब्राइटकॉम ग्रुपच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 59.30 रुपये होती.

ब्राइटकॉम ग्रुप शेअरने 1 महिन्यात 100.49 टक्के परतावा

ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्सने मागील एका महिन्यात लोकांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2 मे 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 9.73 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 20.61 रुपयांवर पोहोचले आहेत.

जर तुम्ही 1 महिन्यापूर्वी ब्राइटकॉम ग्रुप शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.11 लाख रुपये झाले असते. मागील 5 दिवसात ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्सने लोकांना 20.88 टक्के नफा कमावून दिला आहे.

दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांची गुंतवणूक

दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. जानेवारी-मार्च 2023 तिमाहीच्या नवीनतम शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, शंकर शर्मा यांच्याकडे ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे एकूण 25,000,000 शेअर्स आहेत.

त्यांनी कंपनीचे एकूण 1.24 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. सध्याच्या शेअरच्या किमतीनुसार शंकर शर्मा यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 51.52 कोटी रुपये आहे. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4159 कोटी रुपये आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Brightcom Group Share Price today on 03 June 2023.