
Brightcom Share Price | ब्राइटकॉम गृप स्टॉक जबरदस्त अस्थिरतेत ट्रेड करत आहेत. कधी अचानक हा स्टॉक अप्पर सर्किटवर हीट करतो, तर कधी अचानक या स्टॉकमध्ये उतरती कळा लागते. मागील काही दिवसांपासून सतत तेजीत असणाऱ्या ब्राइटकॉम गृप स्टॉकमध्ये आज लोअर सर्किट लागला आहे.
मात्र काल गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कमकुवत बाजारातही या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये 20.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. यापूर्वी सलग पाच दिवस हा स्टॉक अप्पर सर्किट हीट करत होता. आज शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी ब्राइटकॉम गृप स्टॉक 4.95 टक्के घसरणीसह 19.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील पाच दिवसात ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 21 टक्के वाढले आहेत. तर मागील 10 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 53 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. ब्राइटकॉम गृप कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 43.65 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 9.35 रुपये होती. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार शंकर शर्मा यांनी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे 2.3 कोटी शेअर्स होल्ड केले आहेत.
शेअर बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने नुकताच एक आदेश जारी करून ब्राइटकॉम गृप कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश कुमार रेड्डी आणि मुख्य वित्तीय अधिकारी एस एल नारायण राजू यांना पदावरून दूर केले होते. सेबीच्या या आदेशानंतर ब्राइटकॉम गृप कंपनीच्या शेअर मध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती.
2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीमधील लेटेस्ट शेअर होल्डिंग डेटानुसार, शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार शंकर शर्मा यांच्या पोर्टफोलिओमध्ये ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे 2.30 कोटी शेअर्स म्हणजेच जवळपास कंपनीच्या एकूण भाग भांडवलाच्या 1.14 टक्के हिस्सा आहे.
ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्सनी मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 1200 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 2 वर्षांत दोन वेळा या कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. ब्राइटकॉम गृप कंपनीने ऑगस्ट 2021 मध्ये आपल्या शेअर धारकांना 1 : 4 या प्रमाणात आणि मार्च 2022 मध्ये 2 : 3 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स जारी केले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.