 
						Britannia Industries Share Price | ‘ब्रिटानिया इंडस्ट्रीज’ या वाडिया ग्रुपच्या मालकीच्या कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रति शेअर 72 रुपये लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ब्रिटानिया इंडस्ट्रीज’ ही कंपनी खाद्यपदार्थ उत्पादन संबंधित क्षेत्रात व्यापार करणारी कंपनी आहे. काही आठवड्यापूर्वी पार पडल्येल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ‘ब्रिटानिया इंडस्ट्रीज’ कंपनीने प्रत्येक शेअरवर 7200 टक्के लाभांश देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. ‘ब्रिटानिया इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक्स डिव्हिडंडवर ट्रेड करत होते. कंपनीने लाभांश वाटपाची रेकॉर्ड तारीख म्हणून गुरुवार दिनांक 13 एप्रिल 2023 हा दिवस निश्चित केला होता. गुरूवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.38 टक्के घसरणीसह 4,255.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Britannia Industries Limited)
1 लाखावर 90 लाख परतावा :
‘ब्रिटानिया इंडस्ट्रीज’ कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ काळात जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. 11 एप्रिल 2003 रोजी ‘ब्रिटानिया इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज इंडेक्सवर 47.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 13 एप्रिल 2023 रोजी ‘ब्रिटानिया इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 4268.75 रुपये किमतीवर पोहचले आहेत. जर तुम्ही 11 एप्रिल 2003 रोजी ‘ब्रिटानिया इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 90.43 लाख रुपये झाले असते.
गुंतवणूकीवर परतावा :
मागील एका वर्षात ब्रिटानिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 27.25 टक्के परतावा कमावून दिला आहे. ‘ब्रिटानिया इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 13 एप्रिल 2022 रोजी 3347.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 4680 रुपये होती. तर या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 3150 रुपये होती. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत :ब्रिटानिया इंडस्ट्रीज’ कंपनीने 4011.17 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीने 766.93 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		