
Canara Bank Share Price | भारतीय शेअर बाजारात ‘बिग बुल’ या नावाने प्रसिद्ध असलेले दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या या सरकारी बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. या बँकेचे नाव आहे, “कॅनरा बँक”. 27 ऑक्टोबर 2022 रोजी या सरकारी बँकेच्या शेअर्सनी मागील 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत गाठली आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजम/BSE मध्ये या सरकारी बँकेच्या शेअर्सनी 292 रुपयांची नवीन किंमत स्पर्श केली आहे. कॅनरा बँकेच्या शेअर्समध्ये सध्या सकारात्मक तेजी दिसून येत आहे. पुढील येणाऱ्या काळातही या बँकेच्या शेअरमध्ये चांगली वाढ होईल असा अंदाज शेअर बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. कॅनरा बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 171.70 रुपये होती.
शेअरची पुढील लक्ष किंमत :
स्टॉक मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कॅनरा बँकेचे शेअर्स पुढील येणाऱ्या काळात 340 रुपयांपर्यंत जाऊ शकतात. बँकिंग स्टॉक्स, विशेषतः मध्यम आकाराच्या खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर स्टॉक मार्केट तेजीत दिसून येत आहे. शेअर बाजार तज्ञांचे म्हणणे आहे की कॅनरा बँकेचे शेअर्स अत्यंत सकारात्मक तेजीत वाढत आहेत, कारण त्यांच्या साप्ताहिक आणि मासिक चार्टवर ब्रेकआउट दिसून येत आहे. जीसीएल सिक्युरिटीजचे तज्ञ म्हणतात की, नवीन गुंतवणूकदारांनी हे शेअर्स खरेदी केले पाहिजे, आणि विद्यमान शेअर धारकांनी 330-340 रुपयांच्या लक्ष किमतीसाठी स्टॉक होल्ड केले पाहिजे.
दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी सल्ला :
चॉईस ब्रोकिंग फर्मचे तज्ञ म्हणतात की कॅनरा बँकेचे शेअर्स तेजीत असण्याचे कारण म्हणजे बँकेच्या शेअर्सने साप्ताहिक आणि मासिक चार्ट पॅटर्नवर ब्रेकआउट दाखवला आहे. या सरकारी बँकेचे शेअर्स जुलै 2019 च्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत असून शेअर्स नजीकच्या काळात 300 रुपयांची किंमत स्पर्श करू शकतात. कॅनरा बँकेचे शेअर्स होल्ड करणारे गुंतवणूकदार 300 ते 325 रुपयांची लक्ष किंमत निश्चित करू शकतात. या बँकेच्या शेअर्ससाठी 270 चा स्टॉप लॉस ठेवावा. GCL सिक्युरिटीजचे तज्ञ म्हणतात की, गुंतवणूकदार पुढील एका वर्षासाठी हा स्टॉक 400 रुपये लक्ष किंमत उद्दिष्ट ठेवून खरेदी करू शकतात. हा स्टॉक मूलभूत आणि तांत्रिक दोन्ही दृष्टीने अत्यंत तेजीत व्यवहार करत आहे.
झुनझुनवाला यांचा पोर्टफोलिओ :
दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे 14 ऑगस्ट 2022 रोजी निधन झाले होते. त्यांनी कॅनरा बँकेच्या शेअर्स मध्ये मोठी गुंतवणुक केली होती. झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये कॅनरा बँकेचे 26,847,400 शेअर्स आहेत. कॅनरा बँकेच्या जुलै-सप्टेंबर 2022 च्या शेअरहोल्डिंग चार्ट पॅटर्न डेटानुसार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये कॅनरा बँकेचे 26,847,400 शेअर्स आहेत. याचा अर्थ झुनझुनवाला यांच्याकडे कॅनरा बँकेत 1.48 टक्के गुंतवणूक आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.