1 April 2023 9:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Deep Industries Share Price | हा शेअर स्प्लिट होतोय, शेअरची किंमत पाच पट घटणार, खरेदी करणार? IFL Enterprises Share Price | ही कंपनी गुंतवणुकदारांना दुहेरी फायदा देणार, कंपनीने स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सची घोषणा Apollo Pipes Share Price | या कंपनीच्या शेअरची किंमत इतक्या तेजीत वाढली की गुंतवणुकदार करोडपती झाले, परतावा पाहून गुंतवणूक करा April Month Horoscope | एप्रिल महिन्यात 12 राशींमध्ये कोणाला नशिबाची साथ? कोणासाठी मोठी संधी? तुमचं मासिक राशीभविष्य वाचा Odysse Vader e-Bike | ओडिसे वडर ई-बाइक लॉन्च, फुल चार्ज वर 125 किमी रेंज, 999 रुपये टोकन देऊन बुक करा SRF Share Price | या शेअरने 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 1.20 कोटी रुपये परतावा दिला, आता नवी टार्गेट प्राईस, खरेदी करावा का? Multibagger Stocks | पैशाचा छापखाना! या 8 मल्टिबॅगर शेअर्सनी 8375 टक्क्यांपर्यंत परतावा दिला, फक्त 1 वर्षात कमाई, खरेदी करणार?
x

Cera Sanitaryware Share Price | करोडपती झाले या शेअरचे गुंतवणूकदार, 1 लाखावर दिला 9.44 कोटी परतावा, स्टॉक डिटेल्स

Cera Sanitaryware Share Price

Cera Sanitaryware Share Price | शेअर बाजारात परतावा नुसता पैसे गुंतवून मिळत नाही, तर जास्तीत जास्त संयम राखल्याने मिळतो..सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून चांगली कमाई करू इच्छित असाल, तर तुम्ही दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक केली पाहिजे. दीर्घकाळात अनेक कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा कमावून दिला आहे. सेरा सॅनिटरी वेअरचे शेअर्स हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. हा स्टॉक मागील एक वर्षापासून कन्सोलिडेशनच्या टप्प्यात आहे. मागील बऱ्याच वर्षात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी सुद्धा गुंतवणूक केली आहे. मागील दोन दशकात या कंपनीच्या शेअरची किंमत दहा रुपये वरून वाढून 4725 रुपये पर्यंत पोहोचली आहे. या काळात गुंतवणूकदारांनी 47150 टक्के परतावा कमावला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Cera Sanitaryware Share Price | Cera Sanitaryware Stock Price | BSE 532443 | NSE CERA)

गुंतवणुकीतून मिळणारे फायदे :
सेरा सॅनिटरी वेअर कंपनीचे शेअर्स सप्टेंबर 2010 मध्ये एक्स-बोनस वर ट्रेड करत होते. कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस जारी केले होते. जर तुम्ही 20 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावले असते आणि आपले स्टॉक होल्ड करून ठेवले असते तर, आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 94,300 टक्के वाढले असते. कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स जारी केले होते.

भारतीय शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार विजय केडिया यांनी सेरा सॅनिटरी वेअर कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. मागील एका वर्षात या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना केवळ 2 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 2,735 रुपये वरून वाढून 4,725 रुपयेवर पोहचली आहे. या कालावधीत शेअरची किंमत 75 टक्क्यांनी वधारली आहे. मागील 10 वर्षांत या कंपनीचे शेअर्स बीएसई निर्देशांकावर 300 रुपयेवरून वाढून 4,725 रुपयेवर पोहचले आहेत. मागील 10 वर्षात या कंपनीच्या शेअर ने आपल्या गुंतवणूकदारांना 1,475 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील 15 वर्षांत या मल्टीबॅगर स्टॉकची किंमत 70 रुपयेवरून वाढून 4,725 रुपये वर गेली आहे. याकाळात शेअरची किंमत 6,650 टक्के वधारली आहे. वीस वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअरची किंमत 10 रुपये होती, जी सध्या वाढून 4,725 रुपये झाली आहे. या काळात गुंतवणूकदारांनी 47,150 टक्के परतावा कमावला आहे.

बोनस शेअरचा प्रभाव :
सेरा सॅनिटरी वेअर कंपनीने सप्टेंबर 2010 मध्ये आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप केले होते. जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीत बोनस शेअर जारी होण्यापूर्वी गुंतवणूक करता, तेव्हा बोनस शेअर वाटप झाल्यावर तुमच्या शेअरची संख्या दुप्पट होते. पंधरा वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर 35 रुपये प्रति शेअर या किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही त्यावेळी 35 रुपये प्रति शेअर या किमतीवर शेअर खरेदी केले असते तर, तर बोनस शेअर मिळाल्यानंतर तुमच्या शेअर्सची संख्या दुप्पट झाली असती. सध्याच्या किमतीनुसार तुम्हाला 15 वर्ष कालावधीत 13,300 टक्के परतावा मिळाला असता. त्याचप्रमाणे 20 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरची किंमत 5 रुपये होती. जर त्यावेळी तुम्ही यात गुंतवणूक केली असती तर बोनस शेअर मिळाल्यानंतर तुमच्या शेअरची संख्या दुप्पट झाली असती. आणि सध्याच्या किमतीनुसार तुम्हाला 94300 टक्के परतावा मिळाला असता.

गुंतवणुकीवर परतावा :
जर तुम्ही एक वर्षापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते, आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.02 लाख रुपये झाले असते. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 15.75 लाख झाले असते. त्याचप्रमाणे जर तुम्ही 15 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.34 कोटी रुपये झाले असते. जर तुम्ही 20 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असतेस तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 9.44 कोटी रुपये झाले असते.

विजय केडिया पोर्टफोलिओ :
या कंपनीचे शेअर्स NSE आणि BSE या दोन्ही निर्देशांकावर उपलब्ध आहेत. पूर्वी या कंपनीचे शेअर्स फक्त BSE निर्देशांकावर ट्रेड करत होते. नोव्हेंबर 2007 पासून शेअर NSE इंडेक्सवर ट्रेड करु लागले. या कंपनीचे बाजार भांडवल 6,144 कोटी रुपये आहे. एप्रिल ते जून 2022 या तिमाहीतील शेअरहोल्डिंग डेटा पॅटर्ननुसार, विजय केडिया याच्या पोर्टफोलिओ मध्ये या कंपनीचे 1.02 टक्के भाग भांडवल सामील आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Cera Sanitaryware Share Price 532443 CERA stock market live on 28 January 2023.

हॅशटॅग्स

#Cera Sanitaryware Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x