
Cigarette Stocks Crash | काल आर्थिक वर्ष 2023 चा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पिय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सिगारेटवर अतिरीक्त कर लावण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गॉडफ्रे फिलिप्स इंडिया आणि आयटीसी लिमिटेड कंपन्याच्या शेअर मध्ये जबरदस्त घसरण झाली. सिगारेट कंपन्यांच्या शेअर्समध्ये पाच टक्क्यांचा लोअर सर्किट लागला होता. गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी गॉडफ्रे फिलिप्स इंडिया कंपनीचे शेअर्स 1.81 टक्के वाढीसह 1,853.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तर आयटीसी कंपनीचे शेअर्स 5.42 टक्के वाढीसह 381.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
गॉडफ्रे फिलिप्स या सिगारेट कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 4.92 टक्क्यांच्या घसरणीसह 1,828.75 रुपयांवर पोहचले होते. तर गोल्डन टोबॅको कंपनीचे शेअर्स 3.81 टक्क्यांच्या कमजोरीसह 59.4 रुपयांवर पोहचले होते. आयटीसी कंपनीचा स्टॉक 0.78 टक्क्यांच्या घसरणीसह 349 रुपयांवर क्लोज झाला होता. तर एनटीसी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1.4 टक्क्यांनी खाली आले होते. व्हीएसटी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स देखील 0.35 टक्क्यांपर्यंत पडले होते.
घोषणेचा नकारात्मक परिणाम :
आर्थिक वर्ष 2023 च्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सिगारेटवर अतिरीक्त कर वाढवण्याची घोषणा केली. आणि सिगारेटवरील करात 16 टक्के वाढ करण्याची घोषणा केली. यामुळे सिगारेट व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त पडझड पाहायला मिळाली होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.