
CMS Info Systems Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये CMS इन्फो सिस्टम्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स कोसळले होते. मात्र आज हा स्टॉक तेजीत धावत आहे. खरे तर CMS इन्फो सिस्टम्स लिमिटेड कंपनीच्या प्रवर्तकांनी त्यांचे काही शेअर्स विकले आहेत. या प्रवर्तकांमध्ये सायन इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्सने सीएमएस इन्फो सिस्टीम कंपनीचे 13.7 टक्के भागभांडवल 638 कोटी रुपयेच्या ब्लॉक डीलद्वारे खुल्या बाजारात विकले आहेत.
कंपनीच्या शेअर होल्डिंग डेटानुसार मार्च 2023 च्या तिमाहीपर्यंत सायन इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्स कंपनीकडे CMS इन्फो सिस्टीम्स कंपनीचे 60.24 टक्के भाग भांडवल होते. आता त्यांचे भाग भांडवल 60.24 टक्केवरून घसरून 46.54 टक्केवर आले आहे. आज सोमवार दिनांक 12 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.70 टक्के वाढीसह 321.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
NSE बल्क डील डेटानुसार, सायन इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्स कंपनीने 300.23 रुपये सरासरी किमतीत CMS इन्फो सिस्टम्स लिमिटेड कंपनीचे 2,12,40,000 शेअर्स खुल्या बाजारात विकले आहेत. मानसी शेअर्स अँड स्टॉक अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने देखील 309.31 रुपये सरासरी किमतीत CMS इन्फो सिस्टम्स लिमिटेड कंपनीचे 9,08,303 शेअर्स खुल्या बाजारात विकले आहेत. या व्यवहाराचे एकूण मूल्य 637 कोटी रुपये होते.
दरम्यान अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीने देखील 300 रुपये सरासरी किमतीवर CMS इन्फो सिस्टम्स लिमिटेड कंपनीचे 20 लाख शेअर्स म्हणजेच 1.69 टक्के भाग भांडवल खुल्या बाजारात विकले आहेत. परकीय गुंतवणूकदारांव्यतिरिक्त तीन भारतीय फंड हाऊस जसे की, एसबीआय म्युच्युअल फंड, 360 वन म्युच्युअल फंड, आयआयएफएल म्युच्युअल फंड यांनी सीएमएस इन्फो सिस्टीम कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.
कंपनी थोडक्यात
CMS इन्फो सिस्टम्स लिमिटेड कंपनीचा IPO 2021 मध्ये बाजारात लाँच करण्यात आला होता. CMS इन्फो सिस्टम्स लिमिटेड कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 205-216 रुपये प्रति शेअर जाहीर करण्यात आली होती. आता हा स्टॉक 321 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. CMS इन्फो सिस्टम्स लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी रोख व्यवस्थापन करणारी कंपनी मानली जाते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.