 
						Coal India Share Price | कोल इंडिया या महारत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्ट फर्मने पुढील 12 महिन्यांसाठी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आर्थिक वर्ष 2023-2024 मध्ये कोल इंडिया कंपनीने जबरदस्त कामगिरी केली होती. ( कोल इंडिया कंपनी अंश )
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी कोल इंडिया स्टॉक 0.40 टक्के घसरणीसह 447.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांच्या मते, कोल इंडिया कंपनीचे शेअर्स दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी आकर्षक वाटत आहेत. ऊर्जा क्षेत्रातील मजबूत मागणीमुळे कंपनीच्या व्यवसायात मजबूत वाढ होण्याची अपेक्षा आहे. भारताच्या ऊर्जा निर्मितीत कोळशा आधारित वीज निर्मितीचा वाटा 50 टक्के आहे. देशातील 40 टक्के विजेची गरज कोळशाच्या माध्यमातून भागवली जाते. अशा स्थितीत भारतातील ऊर्जेचा प्राथमिक स्त्रोत कोळसा आहे. 2030 पर्यंत देशात कोळशाची मागणी 1.5 अब्ज टन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचा थेट फायदा कोल इंडिया सारख्या सरकारी कंपनीला होईल.
कोल इंडिया कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 774 मेट्रिक टन कोळसा उत्पादनाची सर्वोच्च पातळी स्पर्श केली आहे. भारत सरकारने 2025 पर्यंत 24×7 वीज पुरवठ्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. त्यामुळे कोल इंडिया कंपनीने आर्थिक वर्ष 2026 पर्यंत 1000 MT कोळशाचे उत्पादन करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. कोल इंडिया कंपनीचे उत्पादन आर्थिक वर्ष 20223-26 मध्ये 11 टक्के CAGR ने वाढू शकतो.
आयसीआयसीआय डायरेक्ट फर्मच्या तज्ञाच्या मते, कोल इंडिया कंपनीचे शेअर्स पुढील 12 महिन्यांत 550 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. 4 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर 448 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. हा स्टॉक पुढील काळात सध्याच्या किंमतीपेक्षा 23 टक्के अधिक वाढू शकतो. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 100 टक्क्यांनी वाढली आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीचा स्टॉक 55 टक्के मजबूत झाला आहे. तर 2024 या वर्षात कंपनीचे शेअर्स 18 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		