25 January 2025 5:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा, महिना SIP वर मिळेल 1.35 कोटी रुपये परतावा EPFO New Rule | खाजगी कर्मचाऱ्यांनो, EPFO ने नियम बदलले, कागदपत्रांशिवाय प्रोफाइल अपडेट करा, अन्यथा घामाचा पैसा गमवाल New Auto Taxi Fare | अच्छे दिन आ गए, बस, रिक्षा आणि टॅक्सी भाड्यात मोठी वाढ, इतके पैसे मोजावे लागणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात दुपटीने वाढ, शेअर प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, प्राईस बँड सह डिटेल्स जाणून घ्या Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर फोकसमध्ये, चॉइस इक्विटी ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपया 80 पैशाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 539835
x

Covaxin Approved Emergency Use For children | 2 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिनला मंजूरी

Covaxin Approved Emergency Use For children

मुंबई, 12 ऑक्टोबर | लवकरच देशात लहान मुलांचे कोरोना लसीकरण सुरू होऊ शकते. देशाच्या औषध प्रशासन डीजीसीआयने भारत बायोटेकला कोवॅक्सीन (Covaxin Approved Emergency Use For children) 2 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांना लसीकरण देण्यासाठी परवानगी दिली आहे. भारत बायोटेक आणि आयसीएमआरने मिळून ही लस विकसित केली आहे.

Covaxin Approved Emergency Use For children. Hyderabad-based Bharat Biotech had completed Phase-2 and Phase-3 trials of Covaxin on children below 18 years of age in September. Subject Expert Committee (SEC) has given a recommendation to DCGI (Drugs Controller General of India) for the use of BharatBiotech’s Covaxin for 2-18-year-olds :

देशात आता बालकांना देखील कोरोना व्हॅक्सीन दिली जाणार आहे. केंद्र सरकारने 2 ते 18 वर्षांच्या मुलांसाठी स्वदेशी कोव्हॅक्सीनला मंजूरी दिली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच DCGI नुसार, लसीचे दोन डोस देण्यात येतील. याच्या मार्गदर्शक सूचना अद्याप जारी होणे बाकी आहे. DCGI च्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने मुलांना लस देण्याची प्रोसेस आणि दोन डोसमधील अंतराविषयी देखील माहिती दिली आहे.

सध्या देशात प्रौढांना तीन लसी दिल्या जात आहेत. कोव्हॅक्सिन, कोवीशील्ड आणि स्पूतनिक व्ही. यामधून कोव्हॅक्सीन भारत बायोटेकने बनवली आहे. कोवीशील्ड बनवणारे सीरम इंस्टीट्यूट देखील मुलांची व्हॅक्सीन कोव्हॅक्सीन बनवण्याची तयारी करत आहे. तर जायडस कॅडिलाची व्हॅक्सीन जायकोव-डीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाली आहे. त्याच्या मंजूरीची प्रतिक्षा आहे. ही प्रौढांसह बालकांना देखील दिली जाऊ शकेल. कोव्हॅक्सीनच्या तीन फेजच्या ट्रायलरनंतर बालकांना देखील देण्याची मंजूरी देण्यात आली आहे. जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये देखील अशा प्रकारच्या ट्रायल्सनंतर मुलांसाठी व्हॅक्सीनला मंजूरी देण्यात आली आहे.

यूरोपमध्ये मॉर्डर्नाच्या लसीला बालकांसाठी मंजूरी देण्यापूर्वी 12 ते 17 वर्षांच्या 3,732 बालकांवर ट्रायल करण्यात आली होती. ट्रायलचे परीणाम देखील समोर आले होते की, लसीने मुलांमध्ये देखील प्रौढांच्या बरोबरीने अँटीबॉडी प्रोड्यूस केली आहे. ट्रायलदरम्यान 2,163 मुलांना कोरोना व्हॅक्सीन दिली गेली होती आणि 1,073 जणांना प्लास्बो. ज्या 2,163 बालकांना लस देण्यात आली होती, त्यांच्यामधून कुणालाही कोरोना झाला नाही आणि कोणताही गंभीर दुष्परिणाम देखील झालेला नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Covaxin Approved Emergency Use For children below 18 years of age.

हॅशटॅग्स

#Vaccination(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x