26 January 2025 1:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Property Knowledge | 90% कुटुंबांना माहित नाही, लग्नानंतरही विवाहित मुलगी वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क मागू शकते, कायदा लक्षात ठेवा Income Tax Returns | नोकरदारांनो, टॅक्स वाचवण्यासाठी पती-पत्नी जॉईंट ITR भरू शकतात, जाणून घ्या त्याचे फायदे Govt Employees Pension | पेन्शन ₹9,000 वरून 25,740 रुपये होणार, तर बेसिक सॅलरी ₹18,000 वरून 51,480 रुपये होणार EPFO Passbook | पगारदारांनो आता नवे नियम, पैसे काढणे, अकाऊंट ट्रान्सफर, प्रोफाईल अपडेटचे नियम बदलले, जाणून घ्या नियम New Income Tax Regime | गुडन्यूज, 10 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, 25 टक्क्यांचा नवा टॅक्स स्लॅब जाहीर होण्याची शक्यता SBI Mutual Fund | एसबीआय फंडाच्या 3 जबरदस्त योजना, गुंतवणूकदारांना मिळतोय मोठा परतावा, पैशाने पैसा वाढवा
x

Crayons Advertising Share Price | आला रे आला IPO आला! सर्वात मोठी जाहिरात कंपनी 'क्रेयॉन ॲडव्हरटायझिंग' IPO लाँच करणार, पैसे तयार ठेवा

Crayons Advertising Share

Crayons Advertising Share Price | ‘क्रेयॉन ॲडव्हरटायझिंग’ या भारतातील सर्वात मोठ्या जाहिरात एजन्सीने आपल्या IPO इश्यूसाठी शेअरची किंमत बँड निश्चित केली आहे. ‘क्रेयॉन ॲडव्हरटायझिंग’ कंपनीने आपल्या IPO साठी शेअरची किंमत बँड 62 ते 65 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे.

हा SME IPO पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांसाठी खुला केला जाणार आहे. ‘क्रेयॉन ॲडव्हरटायझिंग’ कंपनीचे IPO स्टॉक सध्या 35 रुपये GMP वर ट्रेड करत आहे. शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध होणारी ही भारतातील पहिली जाहिरात एजन्सी असेल.

IPO चे तपशील :
‘क्रेयॉन ॲडव्हरटायझिंग’ कंपनी आपल्या IPO मध्ये 64.30 लाख इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. यापैकी 30.52 लाख शेअर्स QIB साठी राखीव असतील. तर 9.18 लाख शेअर्स HNIS साठी राखीव असतील, आणि 21.38 लाख शेअर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. कॉर्पोरेट कॅपिटल व्हेंचर्स फर्मला या IPO चे प्रमुख व्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर Skyline Financial Services ला IPO चे रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

या कंपनीचे शेअर्स NSE EMERGE इंडेक्सवर सूचीबद्ध केले जाणार आहे. ‘क्रेयॉन ॲडव्हरटायझिंग’ कंपनीने IPO अंतर्गत 41.79 कोटी रुपये भांडवल उभारण्याची योजना आखली आहे. ‘क्रेयॉन ॲडव्हरटायझिंग’ कंपनी स्वतःचे चित्रपट आणि अॅनिमेशन स्टुडिओ स्थापन करण्याव्यतिरिक्त, आयपीओमधून उभारलेली रक्कम एआर, व्हीआरसह इतर तंत्रज्ञान विकसित करण्यावर खर्च करणार आहे.

‘क्रेयॉन ॲडव्हरटायझिंग’ कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत 203.75 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, त्यात कंपनीने 12.67 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये या कंपनीने एकूण 194.05 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आणि त्यात 1.61 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

‘क्रेयॉन ॲडव्हरटायझिंग’ कंपनीची स्थापना 1986 साली करण्यात आली होती. क्रेयॉन्स कंपनीने यापूर्वी त्याच्या व्यापार विस्तार योजनांची घोषणा केले आहे. ‘क्रेयॉन ॲडव्हरटायझिंग’ कंपनी मध्य पूर्व, यूएस आणि यूकेमध्ये लक्षणीय भारतीय डायस्पोरा उपस्थित असलेले मार्केट शोधत आहोत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Crayons Advertising Share Price IPO check details on 18 May 2023.

हॅशटॅग्स

Crayons Advertising Share(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x