3 February 2023 7:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 04 फेब्रुवारी 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Sterling Tools Share Price | मल्टीबॅगर शेअर, 9 महिन्यांत 200% परतावा, शेअर खरेदी करावा का? Sunteck Realty Share Price | लॉटरी शेअर! फक्त 59 हजाराच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा दिला, आता अजून 70% मिळेल Numerology Horoscope | 04 फेब्रुवारी, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल? तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Income Tax Slab 2023 | वार्षिक पगार 12 लाख रुपये आहे का? नव्या इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये 5 पट टॅक्स भरावा लागणार Star Health & Allied Insurance Share Price | 4 दिवसात 15% परतावा, झुनझुनवालांचा फेव्हरेट शेअर खरेदीचा तज्ञांचा सल्ला, कारण? Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर जबरदस्त कोसळले, खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील आजचे नवे दर पहा
x

Credit Card Default | बापरे! क्रेडिट कार्डचे फायदे तर खूप आहे, पण त्याचे तोटे माहीत आहे का? डिफॉल्ट झाल्यास गडबड होईल

Credit Card default

Credit Card Default | भारतात क्रेडिट कार्ड ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जुलै 2022 पर्यंतची आकडेवारी तपासली तर क्रेडिट कार्ड ग्राहकांची संख्या 7.8 कोटीवर गेली होती. क्रेडिट कार्डचा वापर देशात झपाट्याने वाढत आहे. मे 2022 मध्ये देशात एकूण क्रेडिट कार्डद्वारे खर्च करण्यात आलेला पैशाचा आकडा 1.13 लाख कोटी रुपयेपेक्षा अधिक होता. क्रेडिट कार्ड तुमच्या कठीण प्रसंगी तुम्हाला आर्थिक मदत करतो. परंतु बिलाच्या थकबाकीस विलंब या किंवा निष्काळजीपणे क्रेडिट कार्ड वापरणे तुम्हाला खूप महागात पडू शकते. कारण याचा थेट नकारात्मक परिणाम तुमच्या CIBIL स्कोअरवर होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही क्रेडिट कार्डचा योग्य वापर करणे गरजेचे आहे.

क्रेडिट कार्डचा वापर :
क्रेडिट कार्डची थकबाकी झाल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. क्रेडिट कार्ड वापरणारे लोक पगारदार वर्गात मोडतात. मात्र अनेकदा गरजेपेक्षा जास्त खर्च केले की त्यांना बिल भरायला जीवावर येते. अशावेळी जर बिल वेळेवर भरला नाही तर CIBIL स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. एवढेच नाही तर काही लोक थकबाकीची रक्कम भरतच नाही. जर तुमची थकबाकी रक्कम 6 महिने भरली गेली नाही तर तुमचे क्रेडिट कार्ड डिफॉल्ट होऊ शकते. परिणामी तुमचे क्रेडिट कार्ड खाते तत्काळ प्रभावाने निष्क्रिय होऊ शकते.

क्रेडिट डिफॉल्टिंगचे तोटे :
* क्रेडिट कार्ड डिफॉल्ट झाल्यास तुमच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो, कारण क्रेडिट रेटिंग एजन्सीं तुमचा क्रेडिट कार्ड पेमेंटचे अहवाल नियमितपणे तपासत असतात.
* जर तुमच्या क्रेडिट कार्डची थकबाकी वेळेवर भरली गेली नाही तर बँका किंवा क्रेडिट कार्ड कंपन्या तुम्हाला कर्ज घेण्यास अपात्र घोषित करु शकतात. जर तुम्ही बँकाकडून अपात्र घोषित झालात तर तुम्हाला भविष्यात कोणतीही बँक कर्ज देणार नाही.
* तुमच्या डिफॉल्ट कार्डद्वारे तुम्हाला कोणताही व्यवहार करता येऊ नये म्हणून बँका आणि क्रेडिट कार्ड कंपन्या तुमचा क्रेडिट कार्ड ब्लॉक करू शकतात.
* क्रेडिट कार्ड ब्लॉक झाला की तुम्ही कोणतीही खरेदी किंवा व्यवहार करू शकणार नाही. जोपर्यंत तुम्ही क्रेडिट कार्डची थकबाकी भरत नाही तोपर्यंत तुम्ही पुन्हा कार्ड द्वारे व्यवहार करू शकणार नाही.
* क्रेडिट कार्ड डिफॉल्ट झाल्यास तुम्ही कायदेशीर अडचणीत येऊ शकता, आणि हे प्रकरण न्यायालयातही जाऊ शकते.
* क्रेडिट कार्ड बिल वेळेवर न भरल्यास, तुमच्या क्रेडिट कार्डवर व्याजदर आणि दंड वाढू शकतो.
* तुमच्या बँकेकडे तुमच्या बचत किंवा इतर खात्याचा तपशील असेल तर देय रक्कम वसूल करण्यासाठी बँक तुमच्या खात्यात जमा केलेली रक्कम गोठवू शकते.
* थकबाकीचे पैसे मिळवण्यासाठी बँकेचे किंवा क्रेडिट कार्ड कंपनीचे रिकव्हरी एजंट तुमच्या घरी येऊ शकतात. सामान्यतः बँका क्रेडिट कार्ड बिल भरणासाठी सवलत देतात.
* हा सवलत कालावधी बँक 60 ते 90 दिवसांपर्यंत वाढवू शकते. परंतु या कालावधीत क्रेडिट कार्ड थकबाकी पेमेंट न केल्यास वसुली एजंट सरळ तुमच्या घरी येतील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Credit Card default consequences and Effects on financial health on 26 November 2022.

हॅशटॅग्स

Credit Card default(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x