
Credit Card Upgradation | बॅंकेत खाते खोलल्यानंतर आपल्याला डेबीट कार्ड दिले जाते. मात्र अनेक व्यक्ती यावर क्रेडीट कार्ड देखील घेतात आणि नंतर त्याचे बिल भरतात. यात क्रेडीट कार्डवर अनेक सवलती देखील मिळतात. तुमचा क्रेडीट स्कोर कसा आहे त्यानुसार ऑफर मिळतात. तसेच जेव्हा तुम्ही क्रेडीट कार्डसाठी अर्ज करता तेव्हा तुम्हाला एक एंट्री कार्ड देखील दिले जाते. यात अनेक बक्षिसे, कॅशबॅक, प्रवासी लाभ इत्यादी सुविधा असतात. मात्र काही कार्डवर या सुविधा उपलब्ध नसतात. कारण हे कार्ड काही ठरावीक सेवांसाठी डिझाइने केलेले असतात. जेव्हा सुरुवातीला तुम्ही हे कार्ड घेता तेव्हा ते अपग्रेड करावे लागते नंतर तुमच्या सुविधा सुरु होतात. मात्र ते करण्याधी या चार गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवायला हव्यात.
सर्वाधीक खर्च कशावर करता
प्रत्येक क्रेडीट कार्डचा विशिष्ट साचा असतो. त्या त्या गोष्टींसाठीच हे कार्ड वापरले जाते. जेव्हा तुम्ही हे कार्ड घेता तेव्हा ते इलेक्ट्रॉनीक सेवेसाठी असेल तर तुम्ही त्यातुन फ्रीज, फोन, फॅन अशा इलेक्ट्रॉनीक गोष्टी विकत घेतल्यास त्यावर सवलत मिळते. मात्र या व्यतीरीक्त काही गोष्टी खरेदी केल्या तर त्यावर सवलत मिळत नाही.
क्रेडिट कार्डवर असलेला परतावा जाणून घ्या
तुम्ही ज्या प्रकारचे क्रेडीट कार्ड निवडले आहे त्यावर कोणत्या अटी आणि कोणत्या सवलती आहेत हे प्रामुख्याने जाणून घ्या. पैसाबाजारचे संचालक आणि क्रेडिट कार्ड प्रमुख सचिन वासुदेव या विषयी सांगतात की, जर तुम्हाला ऑनलाइन शॉपींग सारख्या ठिकाणी अधिक पैसे खर्च करावे वाटत असेल तर त्या नुसार कार्ड निवडा. कारण काही कार्यवर भरगोस सुट असते तर काहींवर मर्यादीत. त्यामुळे तुमचे कार्ड अपग्रेड करताना त्याची मर्यादा आणि सुट आवश्य तपासा आणि मगच खर्च करा.
वार्षीक शुल्क तपासावे
जेव्हा सामान्य क्रेडीट कार्ड घेतले जाते तेव्हा त्याचे वार्षिक शुल्क देखील मर्यादीत असते. मात्र जास्त सवलती पुरवणा-या कार्डवर वार्षिक शुल्क जास्त असते. त्यामुळे तुम्हाला मिळणा-या सवलतींपेक्षा ही रक्कम जास्त आहे का हे तपासा. जर तसे असेल तर मिळणा-या सवलतीचा काहीच फायदा होत नाही. काही कार्डवर वार्षिक चार्डबॅक असतो. त्यावर जास्त खर्च झाल्यास घेतलेले शुल्क परत दिले जाते किंवा त्यात सुट दिली जाते. त्यामुळे या सेवा तपासल्यास तुम्हाला अधिक फायदा होईल.
कामाल मर्यादा किती आहे
क्रेडीट कार्ड अपग्रेड करताना मर्यादा निश्चित केली जाते. यात शक्यतो मर्यादा वाढीव स्वरुपात मिळते. त्यामुळे तुम्हाला याचा सध्या जरी फायदा नसला तरी भविष्यात फायदा होतो. यामुळे तुम्हाला तुमची रक्कम भरण्यास जास्तीचा वेळ मिळतो. त्याने तुमचा क्रेडिट स्कोर वाढतो. तसेच चांगला राहतो. मात्र ही मर्यादा तुमचा आधीचा क्रेडीट स्कोर, पगार, कार्डाची श्रेणी यावर ठरवली जाते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.