11 February 2025 11:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | 52 आठवड्यांच्या नीचांकाजवळ पोहोचला आईआरबी इन्फ्रा शेअर, पुढे तेजी येणार का - NSE: IRB RVNL Share Price | 5 महिन्यात तुफान तेजीत परतावा देणारा शेअर सातत्याने घसरतोय, पुढे काय होणार – NSE: RVNL Gold Selling Tips | घरामधील जुनं सोनं विकण्याचा विचार करताय? तत्पूर्वी ही बातमी वाचा, कदाचित विचार बदलू शकतो Jio Finance Share Price | जवळपास 36 टक्क्यांनी घसरलेला जिओ फायनान्शिअल शेअर खरेदी करावा का? अपडेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Steel Share Price | पटापट घसरतोय टाटा स्टील शेअर, गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी, अपडेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL NHPC Share Price | 100 रुपयांच्या पार जाणार हा 73 रुपयांचा पावर शेयर, की 50 रुपयांच्या खाली घसरणार? - NSE: NHPC Multibagger Mutual Fund | शेअर्स नको, या फंडाच्या स्कीममध्ये महिना 2000 रुपये बचतीवर मिळतील 2.47 कोटी रुपये
x

Credit Suisse Bank Stock Price | क्रेडिट सुईस सुद्धा बुडण्याची भीती, 2008 मध्ये लेहमन ब्रदर्सबाबत भविष्यवाणी करणाऱ्या तज्ज्ञाचा दावा

Credit Suisse Bank Stock Price

Credit Suisse Bank Stock Price | जगभरातील वाढत्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर स्वित्झर्लंडची बँक पतसंस्था बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे. अमेरिकेतील बँक संकटाची तीव्रता युरोपपर्यंत पोहोचत असून युरोपातील सर्वात मोठी बँक क्रेडिट सुईस कठीण काळातून जात आहे. क्रेडिट सुईस बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण सुरू आहे. क्रेडिट सुईस बँकेच्या सर्वात मोठ्या गुंतवणूकदाराने कठीण काळात बँकेत गुंतवणूक करण्यास नकार दिला आहे. (Credit Suisse Group AG)

स्विस बँक क्रेडिट सुईसचे शेअर्स बुधवारी डाऊ जोन्समध्ये तब्बल २८ टक्क्यांनी घसरले. बँकेच्या शेअरमध्ये 1 दिवसातील ही सर्वात मोठी घसरण आहे. बँकेचे प्रमुख भागधारक असलेल्या सौदी नॅशनल बँकेने हिस्सा खरेदी न केल्याच्या वृत्तानंतर क्रेडिट सुईसच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. स्वित्झर्लंडमधील क्रेडिट सुईसमध्ये सौदी नॅशनल बँकेचा सर्वात मोठा हिस्सा आहे. हा वाटा ९.९ टक्के आहे. सौदी नॅशनल बँकेने क्रेडिट सुईसमध्ये अधिक गुंतवणूक करण्यास नकार दिला आहे.

२००८ मध्ये लेहमन ब्रदर्स बँक कोसळण्याची भविष्यवाणी करणारे प्रसिद्ध गुंतवणूकदार रॉबर्ट कियोस्की यांनी म्हटले आहे की, क्रेडिट स्विस बँक बुडणार आहे. कियोस्की यांनी म्हटले आहे की, अमेरिकन रोखे बाजार कोसळत आहे आणि ही क्रेडिट सुईसची सर्वात मोठी समस्या आहे. क्रेडिट सुईस ही जगातील सर्वात मोठी बँक आहे. क्रेडिट सुईसचे संकट अधिक चव्हाट्यावर आले तर जगभरातील बँकिंग क्षेत्राला त्याचा फटका बसू शकतो.

१६६ वर्षे जुनी क्रेडिट सुईस जगातील सर्वात मोठ्या बँकांमध्ये गणली जाते. यूबीएस एजीनंतर स्वित्झर्लंडमधील ही दुसरी सर्वात मोठी बँक आहे. अमेरिकेतील सिलिकॉन बेली बँक आणि सिग्नेचर बँक यांच्या पडझडीचा आंतरराष्ट्रीय वित्तीय बाजारावर मर्यादित परिणाम होईल, असा अंदाज आतापर्यंत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

मात्र, जर क्रेडिट सुईस दिवाळखोर झाला किंवा बुडाला तर त्याचा व्यापक परिणाम होऊ शकतो. २००८ च्या जागतिक आर्थिक संकटासारख्या परिस्थितीची पुनरावृत्ती होण्याचा धोकाही काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र, क्रेडिट सुईस बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उलरिच कॉर्नर यांनी मंगळवारी बँकेची आर्थिक स्थिती चांगली आहे, ताळेबंद भक्कम आहे आणि ती बुडण्याची शक्यता नाही, असा दावा केला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Credit Suisse Bank Stock Price hits new low check details on 16 March 2023.

हॅशटॅग्स

#Credit Suisse Bank Stock Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x