29 May 2023 11:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा पॉवर शेअर मजबूत तेजीत, नवीन टार्गेट प्राईस जाहीर, परतावा पाहून गुंतवणूक करा ICRA Share Price | ICRA शेअर्स गुंतवणुकदारांना मिळणार 1300 टक्क्यांचा भरघोस डिव्हीडंड, फायदा घेण्यासाठी रेकॉर्ड तारीख पाहा Rekha Jhunjhunwala Portfolio | स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स शेअर्सने रेखा झुनझुनवाला यांची जोरदार कमाई, स्टॉक डिटल्स पहा Manipur Violence | अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा जातीय हिंसाचार, आतापर्यंत 79 जणांचा मृत्यू, आमदार-मंत्र्यांच्या घरावर हल्ले 50 Percent Commission | मोदींनी इव्हेन्ट केलेल्या मध्य प्रदेश उज्जैन 'महाकाल लोक' येथील महादेवाचे ६ पुतळे कोसळले, कॉट्रॅक्टर गुजरातचा निघाला Credit Card Reward Points | क्रेडिट कार्डवर तुमच्याकडून वर्षाला 10 हजार रुपये वसूल केले जातात, तुम्हाला ही ट्रिक माहित आहे? Property Knowledge | प्रॉपर्टी विकताना फक्त एवढीच रक्कम कॅशमध्ये घ्या, नाहीतर ही चूक किती महागात पडेल लक्षात घ्या
x

Cressanda Solutions Share Price | 'क्रेसेंडा सोल्यूशन्स' शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले, अल्पावधीत दिला 14000% परतावा, डिटेल्स पहा

Cressanda Solutions Share Price

Cressanda Solutions Share Price | ‘क्रेसेंडा सोल्यूशन्स लिमिटेड’ या आयटी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात ‘क्रेसेंडा सोल्यूशन्स लिमिटेड’ कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 14000 टक्के नफा कमावून दिला आहे. क्रेसेंडा सोल्युशन्स कंपनीचे शेअर 19 पैशांवरून वाढून आता 27 रुपये किमतीवर पोहचले आहेत.

या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 42.25 रुपये होती. तर क्रेसेंडा सोल्यूशन्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 17.35 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी ‘क्रेसेंडा सोल्यूशन्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 26.28 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

1 लाखावर दिला 1.4 कोटी परतावा :
22 मे 2020 रोजी ‘क्रेसेंडा सोल्यूशन्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 19 पैशांवर ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स 18 मे 2023 रोजी 27.15 रुपये किमतीवर पोहचले आहेत. ‘क्रेसेंडा सोल्यूशन्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सनी मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 14020 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.42 कोटी रुपये झाले असते.

2 वर्षात दिला 6650 टक्के परतावा :
‘क्रेसेंडा सोल्यूशन्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सने मागील 2 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 6650 टक्के परतावा कमावून दिला आहे. 14 मे 2021 रोजी या कंपनीचे शेअर 39 पैशांवर ट्रेड करत होते. 18 मे 2023 रोजी ‘क्रेसेंडा सोल्यूशन्स’ कंपनीचे शेअर्स 27.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. जर तुम्ही 14 मे 2021 रोजी ‘क्रेसेंडा सोल्यूशन्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 69.61 लाख रुपये झाले असते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1051.63 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Cressanda Solutions Share Price today on 19 May 2023.

हॅशटॅग्स

#Cressanda Solutions Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x