
Cyient DLM Share Price | सध्या तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. पुढील आठवड्यात साइएंट डीएलएम लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या IPO चा आकार 740 कोटी रुपये असेल. साइएंट डीएलएम लिमिटेड कंपनीचा IPO 27 जून ते 30 जून 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल.
IPO तपशील
20 जून 2023 रोजीच्या सेबी फाइलिंगमध्ये, सायएंट कंपनीने रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस मसुदा सादर केला होता. तेलंगणा राज्यातील रजिस्ट्रार ऑफ कंपनीजने 20 जून 2023 रोजी हा DRHP मंजूर केला. साइएंट डीएलएम लिमिटेड कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीचा IPO इश्यू मंगळवार, 27 जून 2023 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला केला जाईल.
शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी हा IPO बंद होईल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार IPO इश्यूची किंमत बँड साइएंट डीएलएम लिमिटेड कंपनी बुक-रनिंग लीड मॅनेजर्ससोबत सल्लामसलत करून इश्यू उघडण्याच्या तारखेच्या दोन दिवस आधी जाहीर करेल.
साइएंट डीएलएम लिमिटेड कंपनीच्या IPO चा एकूण आकार 740 कोटी रुपये आहे. या IPO मध्ये कंपनी फ्रेश शेअर्स इश्यू करणार आहे. साइएंट डीएलएम लिमिटेड कंपनीच्या इक्विटी शेअर्सचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे. या IPO अंतर्गत कंपनी फ्रेश शेअर्स खुल्या बाजारात विकून भांडवल उभारणी करणार आहे.
कंपनी IPO अंतर्गत जमा केलेली रक्कम व्यापार वाढीसाठी खर्च करणार आहे. अॅक्सिस कॅपिटल आणि जेएम फायनान्शियल यांना IPO चे लीड बुक-रनिंग मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. तर केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडला IPO इश्यूचे रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.