30 April 2025 11:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Cyient Share Price | लॉटरी शेअर! या IT कंपनीच्या शेअरने करोडपती बनवले, स्टॉक मध्ये जबरदस्त तेजी, पहा टार्गेट प्राईस

Cyient Share Price

Cyient Share Price | ‘सायएंट लिमिटेड’ या इंजिनीअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग, डेटा अॅनालिटिक्स, आणि नेटवर्क क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीचे शेअर्स आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. 2023 या वर्षात ‘सायएंट लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 17 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. बुधवार दिनांक 1 मार्च 2023 रोजी ‘सायएंट लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 0.92 टक्के वाढीसह 953.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअरवर 60000 रुपये लावून स्टॉक दीर्घकाळ होल्ड केला, ते लोक आता करोडपती झाले आहेत. सध्या अनेक ब्रोकरेज फर्म आयटी सेवा कंपनीकडे गुंतवणूकीची सुवर्ण संधी म्हणून पाहत आहेत. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांच्या मते सध्याच्या किंमत पातळीवर जर ‘सायएंट लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स खरेदी केले ते पुढील काळात 22 टक्के नफा मिळू शकतो. म्हणून शेअर बाजारातील बऱ्याच तज्ञांनी ‘सायएंट लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Cyient Share Price | Cyient Stock Price | BSE 532175 | NSE CYIENT)

‘सायएंट लिमिटेड’ स्टॉकची लक्ष्य किंमत :
‘सायएंट लिमिटेड’ कंपनी रेल्वे कन्सल्टिंग आणि युटिलिटी या क्षेत्रात काम करते. हे क्षेत्र वगळता कंपनीचे उर्वरित विभाग चांगले काम करत आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते डिसेंबर 2022 च्या पहिल्या 9 महिन्यांत ‘सायएंट लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये 15 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांच्या मते कंपनीचे उर्वरित विभाग आता रिकव्हरीच्या मार्गावर असून आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंपनीच्या एकूण उत्पन्न वाढीमध्ये लक्षणीय योगदान देऊ शकतात. ब्रोकरेज फर्मच्या मते नेतृत्व रचनेतील बदल आणि व्यवसायाचे डी-कप्लिंग यामुळे ‘सायएंट लिमिटेड’ कंपनीच्या कमाईवर सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतो. या कारणांमुळे ब्रोकरेजने ‘सायएंट लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग कायम ठेवली असून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मोतीलाल फर्मने या कंपनीच्या शेअरसाठी 1170 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.

गुंतवणुकदार झाले करोडपती :
9 जून 1998 रोजी ‘सायएंट लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 5.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून आतापर्यंत या स्टॉकमध्ये 168 पट वाढ झाली असून शेअर 953 रुपये किमतीवर पोहचला आहे. म्हणजे ज्या लोकांनी 1998 मध्ये ‘सायएंट लिमिटेड’ कंपनीच्या शेअरवर 60,000 रुपये लावले होते, ते लोक आता करोडपती झाले आहेत. या स्टॉकने केवळ दीर्घ मुदतीत नाही तर अल्पकाळातही गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील वर्षी 3 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 724 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 23 फेब्रुवारी 2023 रोजी म्हणजेच अवघ्या चार महिन्यांत हा स्टॉक 37 टक्क्यांनी वाढून 985 रुपयांवर पोहोचला होता. ‘सायएंट लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची वार्षिक उच्चांक पातळी किंमत 985 रुपये होती. सध्या हा स्टॉक आपल्या उच्चांक किमतीच्या तुलनेत 4 टक्के स्वस्त झाला आहे. शेअर बाजार तज्ञ याला गुंतवणुकीची उत्तम संधी मानत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Cyient Share Price 532175 stock market live on 01 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Cyient Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या