
Cyient Share Price | सायंट लिमिटेड या IT कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवार 2 जून 2023 च्या ट्रेडिंग सेशनमध्ये मजबूत वाढ पाहायला मिळाली होती. सायंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 1525.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्स नुकतच 1,500 रुपये किंमतीचा टप्पा पार केला आहे.
सायंट शेअर्सची 52 आठवड्यांची पातळी
सायंट लिमिटेड शेअर्सने 1525.55 रुपये ही उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. तर या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 724 रुपये होती. शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.49 टक्के वाढीसह 1,461.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
सायंट शेअरने 9500 टक्के परतावा दिला
30 मे 2003 रोजी सायंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 15.11 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ज्यां लोकांनी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 96 लाख रुपये झाले आहेत. 2 जून 2023 रोजी या आयटी कंपनीचे शेअर्स 1458.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
सायंट लिमिटेड कंपनीच्या शेअरनी या कालावधीत लोकांना 9555 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 30 मे 2003 रोजी सायंट लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 96.55 लाख रुपये झाले असते.
सायंट शेअरची कामगिरी
मागील 5 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 80 टक्के मजबूत झाले आहेत. तर मागील एका वर्षात या स्टॉकने लोकांना बक्कळ कमाई करून दिली आहे. 4 जून 2023 रोजी या IT कंपनीचे शेअर्स 809.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स 2 जून 2023 रोजी 1458.90 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या कंपनीच्या स्टॉकने मागील सहा महिन्यांत लोकांना 70.83 टक्के परतावा कमावून दिला आहे.
सायंट शेअरने मागील 1 महिन्यात 25.06 टक्के परतावा दिला
मागील एका महिन्यात सायंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 25.06 टक्के वाढले आहेत. मागील एका वर्षात सायएंट कंपनीच्या शेअरने लोकांचे पैसे 83.46 टक्के वाढवले आहेत. या आयटी कंपनीच्या शेअर्सनी सुरुवातीपासून आतपर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 21197 टक्के परतावा कमावून दिला आहे.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.