23 May 2024 11:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 24 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BHEL Share Price | एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे चार पटीने वाढले, BHEL स्टॉक Hold करावा की Sell? IRFC Share Price | IRFC शेअर अप्पर सर्किट हिट करतोय, आता तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, यापूर्वी 452% परतावा दिला IPO GMP | संधी सोडू नका! हा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ घालतोय, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Tata Motors Share Price | टाटा ग्रुपचे 5 शेअर्स मालामाल करत आहेत, मिळतोय 1647 टक्केपर्यंत परतावा RVNL Share Price | RVNL स्टॉक बुलेट तेजीने परतावा देणार, स्टॉक चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, खरेदीचा सल्ला BEML Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, मागील 4 दिवसांत दिला 25% परतावा, वेळीच फायदा घ्या
x

Delhivery Share Price | लॉजिस्टिक कंपनीचा शेअर 40% स्वस्त झालाय, तिमाही तोट्यात घट होताच जोरदार स्टॉक खरेदी

Delhivery Share Price

Delhivery Share Price | लॉजिस्टिक सेवा प्रदान करणारी कंपनी डेल्हीवरीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. काल इंट्राडे ट्रेडमध्ये या कंपनीचे शेअर्स 7 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डेल्हीवरी कंपनीच्या शेअर्सची किंमत 328.40 रुपयांवर पोहोचली होती. कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे प्रमुख कारण म्हणजे कंपनीने शेअर बाजार नियामक सेनी माहिती दिली आहे की, 2015 च्या तरतुदींनुसार डेल्हीवरी कंपनीने लॉजिस्टिक्समधील करिअर संधींसाठी प्रशिक्षण आणि भर्ती कार्यक्रम केला आहे. या वर्षी आतापर्यंत YTD आधारे कंपनीच्या शेअरची किंमत 2.53 टक्के कमजोर झळीनाहे. मागील एक वर्षापासून या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 40 टक्के कमजोर झाले आहेत. मंगळवार दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.91 टक्के कमजोरीसह 315.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Delhivery Share Price | Delhivery Stock Price | BSE 543529 | NSE DELHIVERY)

कंपनीबद्दल थोडक्यात :
डेल्हीवेरी कंपनीचा IPO मे 2022 मध्ये शेअर बाजारात आला होता. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत 487 रुपये निश्चित केली होती. आपल्या IPO किमतीच्या तुलनेत शेअरची किंमत सध्या 33 टक्के पेक्षा अधिक पडली आहे. त्याच वेळी शेअर 708.45 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवरून 54 टक्के पडला आहे. डेल्हीवरी कंपनीच्या स्टॉकने लिस्टिंगच्या दिवशी आपल्या गुंतवणूकदारांना बंपर प्रॉफिट दिला होता. जुलै 2022 पर्यंत स्टॉक मध्ये चांगली तेजी आली होती. मात्र नंतर शेअर्समध्ये विक्रीचा दबाव वाढू लागला.

कंपनीची आर्थिक स्थिती :
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या तोट्यात 254 कोटी रुपये घट झाली होती. जो मागील वर्षीच्या याच कालावधीत कंपनीला 635 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. जून 2022 च्या तिमाहीमध्ये कंपनीचा तोटा 399 कोटी रुपये होता, जो या तिमाहीत 254 कोटी रुपये पर्यंत कमी झाला आहे. डेल्हीवरी कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीत 22 टक्के वाढीसह 1,796 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीमध्ये कंपनीने 1,497.7 कोटी रुपये महसूल जमा केला होता. कंपनीच्या महसुलात तिमाही दर तिमाही प्रमाणे वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीने 1,745.7 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Delhivery Share Price 543529 stock market live on 24 January 2023.

हॅशटॅग्स

#Delhivery Share Price(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x