
Bank FD vs Bank Share | भारतीय लोक शेअर बाजारात रिस्क घेऊन गुंतवणूक करण्यास घाबरतात. त्यामुळे ते आपले बँकेत ठेवणे अधिक सुरक्षित मानतात. जर तुम्ही तुमचे पैसे बँक FD मध्ये 7 ते 30 दिवसांसाठी जमा केले तर, तुम्हाला साडेतीन टक्के पेक्षा अधिक परतावा मिळणार नाही. म्हणजे तुम्हाला 1 लाख रुपयेवर एका महिन्यानंतर फक्त 3500 रुपये व्याज मिळेल. पण जर तुम्ही त्या बँकेच्या FD मध्ये पैसे न तक्ता, शेअर्समध्ये एक लाख रुपये गुंतवले तर एका महिन्यात तुम्हाला अडीच लाख रुपये परतावा मिळू शकतो.
एफडी विरुद्ध इक्विटी :
शेअर बाजारात गुंतवणूक करणे निश्चितच जोखमीचे आहे, परंतु जर तुम्ही थोडी जोखीम घेण्यास तयार असाल तर योग्य शेअर मध्ये गुंतवणूक करून काही महिन्यांतच किंवा वर्षांत करोडपती बनू शकता. तुमचे बघता बघता काही दिवसांत किंवा महिन्यात दुप्पट तिप्पट वाढू शकतात. शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा हाच तर फायदा असतो, जोखीम असते, मात्र परतावा पण जबरदस्त असतो.
बँक FD चांगली की बँक इक्विटी? :
काही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्स आणि एफडीमधील परतावा पाहू. समजून घेऊ की, एका महिन्यात हे FD आणि शेअर्स किती परतावा देऊ शकतात. युको बँक 7 ते 29 दिवसांच्या FD वर 2.9 टक्के दराने व्याज परतावा देते, तर युको बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मागील एका महिन्यात 145 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. त्याचप्रमाणे , सेंट्रल बँक ऑफ इंडिया एफडीवर 3.25 टक्के व्याज परतावा देते, मात्र या बँकेने आपल्या शेअर धारकांना 76 टक्केपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये FD केल्यास 3 टक्के व्याज मिळू शकतो. मात्र शेअर शेअर्स तुम्हाला दीर्घ काळात नेत्रदीपक परतावा मिळवून देतील हे नक्की. चला तर मग जाणून घेऊ FD आणि शेअरमधुन या बँकेचे शेअर्स किती परतावा देतात.
बैंकेचे नाव : शेअर मधून परतावा/ FD व्याज
* UCO बँक : 145 टक्के / 2.9 टक्क
* सेंट्रल बँक : 76 टक्के / 3.25 टक्के
* इंडियन ओव्हरसीज बँक : 77.58 टक्के / 3.25 टक्के
* पंजाब नॅशनल बँक : 38 टक्के / 3.50 टक्के
* इंडियन बँक : 10.68 टक्के / 2.80 टक्के
या शेअर्समध्ये पैसे लावण्यापूर्वी नेहमी लक्षात ठेवा की गुंतवणुकी वर परतावा मिळण्याची शाश्वती नाही. तुमचे पैसे वाढतीलच असे नाही. जर तुम्ही घेतलेले शेअर्स पडले तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य कमी ही होऊ शकते.परंतु FD मध्ये पैसे बुडणार नाही, आणि सुरक्षित व्याज परतावा ही मिळेल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.