13 February 2025 6:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | महिना 40 हजार पगार असणाऱ्या खाजगी पगारदारांच्या खात्यात 3,46,154 रुपये जमा होणार, अपडेट जाणून घ्या 8th Pay Commission | आठव्या वेतन आयोगानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात किती वाढ होणार, रक्कम जाणून घ्या Salary Vs Savings Account | 90% लोकांना माहिती नाही सॅलरी अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंटमधील फरक, व्याजदर ते मिनिमम बॅलन्स अटी पहा Tax Exemption on HRA | पगारदारांनो, तुमचा HRA वर टॅक्स सवलत मिळणार का, कसा फायदा होईल समजून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त बचत करा या SBI फंडाच्या योजनेत, महिना 2500 रुपये एसआयपीवर 1.18 कोटी रुपये मिळतील SBI Home Loan | नोकरदारांना SBI बँकेकडून 35 लाखांचे गृहकर्ज हवे असल्यास महिना किती पगार असावा, योग्य माहिती जाणून घ्या Gratuity Money Alert | खाजगी पगारदारांसाठी 25 लाखांपर्यंत ग्रॅच्युईटी वाढली, तुमच्या खात्यात किती रक्कम जमा होईल इथे पहा
x

Dixon Share Price | अल्पवधीत 900 टक्के परतावा देणारा डिक्सन टेक्नॉलॉजी शेअर, आता अजून एका बातमीने पुन्हा मल्टिबॅगर?

Dixon Share Price

Dixon Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डिक्सन टेक्नॉलॉजी स्टॉक एक टक्क्यांच्या वाढीसह 5265 रुपये किंमत पातळीवर पोहोचला होता. मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 10 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.

डिक्सन टेक्नॉलॉजी या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 31036 कोटी रुपये आहे. डिक्सन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 5378 रुपये होती. आणि नीचांक किंमत पातळी 2553 रुपये होती.

मागील 1 महिन्यात डिक्सन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना चार टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील 6 महिन्यांत डिक्सन टेक्नॉलॉजी शेअरची किंमत 82 टक्के वाढली आहे. आज मंगळवार दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी डिक्सन टेक्नॉलॉजी स्टॉक 0.17 टक्के घसरणीसह 5,280.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

27 मार्च 2020 रोजी डिक्सन टेक्नॉलॉजी स्टॉक 678 रुपये या आपल्या नीचांकी पातळीवरून 900 टक्के वाढला आहे. 9 ऑगस्ट 2019 रोजी हा कंपनीचे शेअर्स 388 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर त्यानंतर या कंपनीच्या शेअरमध्ये आतापर्यंत 12 पट अधिक वाढ पाहायला मिळाली आहे. नुकताच Page Electronics Private Limited या डिक्सन टेक्नॉलॉजी कंपनीच्या पूर्ण मालकीच्या युनिटने Xiaomi कंपनीसोबत व्यापारी करार केला आहे. हा करार स्मार्टफोन आणि इतर संबंधित उत्पादनासाठी करण्यात आला आहे.

आता यापुढे Xiaomi कंपनीची भारतातील सर्व उत्पादने उत्तर प्रदेश राज्यातील नोएडामधील उत्पादन युनिटमध्ये बनवले जाणार आहे. डिक्सन टेक्नॉलॉजी ही कंपनी भारतातील सर्वात मोठी डिझाईन कंपनी म्हणून ओळखली जाते. ही कंपनी ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन करते. डिक्सन टेक कंपनी अनेक आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डच्या कंपन्यांसाठी भारतात मोबाईल फोन बनवण्याचे काम करते.

डिक्सन टेक्नॉलॉजी ही कंपनी भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात आघाडीची कंपनी मानली जाते. या कंपनीचा व्यवसाय आणि नफा सातत्याने वाढता राहिला आहे. डिक्सन टेक्नॉलॉजी ही कंपनी शार्क टँक मधील अमन गुप्ता यांच्या बोट कंपनीसाठी कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट बनवण्याचे काम करते. आणि ही कंपनी आघाडीच्या स्मार्टफोन कंपन्यांसाठी मोबाईल पार्ट देखील बनवते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Dixon Share Price today on 03 October 2023.

हॅशटॅग्स

Dixon Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x