 
						DLF Share Price| DLF या रिअल इस्टेट डेव्हलपर कंपनीच्या शेअर्समध्ये 13 जून 2026 रोजी 2.79 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. तर आज हा स्टॉक निंचीत घसरला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये NSE इंडेक्सवर DLF कंपनीचे शेअर्स 504.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 14 जून रोजी या कंपनीचे शेअर्स 0.22 टक्के घसरणीसह 502.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 504.75 रुपये होती.
DLF कंपनीच्या निवासी व्यवसायाने जानेवारी ते मार्च 2023 या तिमाहीत अप्रतिम कामगिरी केली आहे. कंपनीने या काळात 8458 कोटी रुपये मूल्याची नवीन सेल बुकिंग नोंदवली असून त्यात वार्षिक आधारावर 210 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. याशिवाय FY23 मध्ये DLF कंपनीने एकूण 10 दशलक्ष चौरस फूट नवीन लॉन्च केले होते, ज्याचे विक्री मूल्य 15058 कोटी रुपये होते. ही कंपनीची आतपर्यंतची सर्वात मोठी विक्रमी वार्षिक विक्री बुकिंग मानली जात आहे.
DLF कंपनीची योजना
DLF कंपनी या आर्थिक वर्षात 19700 कोटी रुपयये विक्री क्षमतेसह 11 दशलक्ष चौरस फूट नवीन बांधकाम लॉन्च करण्याच विचार करत आहे. आणि त्याव्यतिरिक्त कंपनी सुमारे 7400 कोटी रुपये मूल्याची इन्व्हेंटरी लाँच करणार आहे. डीएलएफ कंपनीने चौथ्या तिमाहीमध्ये 27,000 कोटी रुपये मूल्याचे उत्पादने विकण्याच मानस असल्याची माहिती दिली आहे.
निवासी आणि किरकोळ अशा दोन्ही व्यवसायांवर DLF कंपनीचे व्यवस्थापन मंडळ सकारात्मक भावना व्यक्त करत आहे. कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाने माहिती दिली आहे की, कंपनी अनेक बाजारपेठांमध्ये दर्जेदार नवीन ऑफर जाहीर करून सातत्यपूर्ण फायदेशीर वाढ मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. व्यवस्थापनाने सांगितले की, मजबूत ताळेबंद आणि निरोगी रोख प्रवाह, यासह कंपनी सर्व पॅरामीटर्सवर आपली कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.
स्टॉकची कामगिरी
मागील एका महिन्यात डीएलएफ कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना 7.34 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 25.72 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात DLF कंपनीच्या शेअरने लोकांचे पैसे 58.44 टक्के वाढवले आहेत. तर YTD आधारे या स्टॉकने लोकांना मागील एका वर्षात 32.18 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील 3 वर्षात DLF कंपनीच्या गुंतवणूकदारांनी 230 टक्के नफा कमावला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		