
Dolly Khanna Portfolio| भारतीय प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि शेअर बाजारातील दिग्गज ट्रेडर डॉली खन्ना यांनी Q2 FY23 या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कापड निर्माता कंपनी दीपक स्पिनर्स मधील आपल्या गुंतवणुकीत वाढ केली आहे. दीपक स्पिनर्स कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE निर्देशांकावर 2 टक्केच्या वाढीसह 228 रुपये किमतीवर वर ट्रेड करत होते. आज च्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिपक स्पिनर्सचे शेअर्स इंट्राडे ट्रेडिंगमध्ये 225.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
डॉली खन्ना यांची गुंतवणूक :
सध्या डॉली खन्ना यांच्या पोर्टफोलिओमध्ये दीपक स्पिनर्स कंपनीचे 86,763 इक्विटी शेअर्स आहेत. BSE निर्देशांकाच्या अधिकृत वेबसाईटवर सप्टेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत जाहीर करण्यात आलेल्या नवीन शेअरहोल्डिंग डेटानुसार, अनुभवी स्टॉक ट्रेडर डॉली खन्ना यांच्याकडे सप्टेंबर 2022 पर्यंत दीपक स्पिनर्स कंपनीमध्ये 1.21 टक्के शेअर भागीदारी किंवा 86,763 इक्विटी शेअर्स आहे. मागील एप्रिल-जूनच्या तिमाहीत 1.17 टक्के भागीदारीच्या तुलनेत 2022 च्या या तिमाहीमध्ये त्यांच्याकडे 83,763 शेअर्स जास्त आहेत.
कंपनीच्या स्टॉकची स्थिती :
दीपक स्पिनर्स ही चंदीगड मध्ये स्थित असलेली कापड निर्माता कंपनी आहे. भारतीय कापड बाजारपेठे व्यतिरिक्त ही कंपनी सीरिया, मध्य पूर्व, तुर्की, बेल्जियम आणि यूएसए सारख्या देशांना डायड सिंथेटिक यार्न पुरवते. दीपक स्पिनर्स कंपनीच्या शेअर्सची किंमत गेल्या एका वर्षात 13 टक्के पेक्षा जास्त गडगडली आहे. 2022 मध्ये हा कापड निर्मात्या कंपनीचा स्टॉक आतापर्यंत सुमारे 19 टक्के खाली ट्रेड करत आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.