13 December 2024 3:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO
x

Dolly Khanna Portfolio | हा स्टॉक 303 रुपयांवरून 80 रुपयांपर्यंत खाली आला, आता दिग्गज गुंतवणूकदाराने केली गुंतवणूक

dolly khanna, portfolio, stock market, sold stocks,

Dolly Khanna Portfolio | नुकताच जाहीर करण्यात शेअरहोल्डिंग डेटानुसार, दिग्गज गुंतवणूकदार डॉली खन्ना 30 जून 2022 रोजी एका स्मॉल कॅप फायनान्स बँकेचे 12,27,986 इक्विटी शेअर्स खरेदी केले आहेत. कंपनीच्या एकूण मालकीहक्काच्या जवळपास 1.16 टक्के वाटा डॉली खन्ना यांनी खरेदी केला आहे. त्यांची बँकेतील एकूण गुंतवणूक 9.8 कोटी रुपये आहे.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक :
जून 2022 च्या तिमाहीत प्रसिध्द गुंतवणूकदार डॉली खन्ना यांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये एक स्टॉकचा समावेश केला आहे तो स्टॉक म्हणजे सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक. हा शेअर सध्या त्याच्या सुरुवातीच्या किमतीपेक्षा 73 टक्क्यांनी खाली ट्रेडिंग करत आहे. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक 2021 मध्ये स्टॉक एक्सचेंजवर नोंदवली गेली. कंपनीची इश्यू किंमत सुरुवातीला 305 रुपये होती. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँके सध्या 80.05 रुपये वर ट्रेड करत आहे.

12,27,986 शेअर्स खरेदी :
डॉली खन्ना यांनी या संधीचा फायदा घेऊन 12,27,986 शेअर्स खरेदी केली. नुकताच जाहीर झालेल्या शेअरहोल्डिंग डेटानुसार, डॉली खन्ना यांनी 30 जून 2022 पर्यंत या स्मॉल फायनान्स बँकेचे 12,27,986 इक्विटी शेअर्स खरेदी केले आहेत. म्हणजे एकूण 1.16 टक्के स्टेक डॉली खन्ना यांनी होल्ड केला आहे. म्हणजेच बँकेतील त्यांची गुंतवणूक 9.8 कोटी रुपये आहे.

बँकच्या एकूण ठेवींमध्ये वार्षिक 21 टक्के वाढ :
4 ऑगस्ट 2022 रोजी स्मॉल सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत डॉली खन्ना यांचे नाव टॉप भागधारकांच्या यादीतून वगळले आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकच्या एकूण ठेवींमध्ये वार्षिक 21 टक्के वाढ झाली असून 4,020 कोटी रुपयांच्या ठेवी नोंदवल्या गेल्या आहेत. 4 ऑगस्ट 2022 रोजी, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेच्या संचालक मंडळाची बैठक घेण्याचे झाजर करण्यात आले. 30 जून 2022 रोजी संपलेल्या तिमाही कालावधीसाठी झालेल्या आर्थिक कमाईचा विचार करण्यासाठी आणि त्याला मंजुरी देण्यासाठी बैठक नियोजित करण्यात आली आहे.

डॉली खन्ना यांचा गुंतवणूक पोर्टफोलिओ :
अलीकडेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डॉली खन्ना यांच्या कंपनीला फसवणुकीशी संबंधित नियमांचे पालन न केल्यामुळे 57.75 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ट्रेंडलाइन डेटानुसार, डॉली खन्ना यांच्याकडे 566.6 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. आणि डॉली खन्ना यांनी 26 स्टॉकमध्ये मोठ्या गुंतवणुकी केल्या आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Dolly Khanna Portfolio Suryoday Small Finance Bank Stock on 27 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x