 
						DP Wires Share Price | डीपी वायर्स या वायर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या शेअर्सने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. डीपी वायर्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अवघ्या 3 वर्षांत 1000 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. आता ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. डीपी वायर्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे.
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डीपी वायर्स कंपनीचे शेअर्स 5.50 टक्क्यांच्या वाढीसह 682 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. दिवसभराच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डीपी वायर्स कंपनीचे शेअर्स 722 रुपये किमतीवर पोहचले होते. आज गुरूवार दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी डीपी वायर्स कंपनीचे शेअर्स 2.84 टक्के वाढीसह 699.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
बोनस शेअर्स तपशील
डीपी वायर्स कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी एक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक मंडळ गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा विचार करणार आहे. बोनस शेअर वाटपला संचालक मंडळाची मान्यता मिळाल्यास, डीपी वायर्स कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वाटप करेल.
गुंतवणुकीवर परतावा
मागील 3 वर्षात डीपी वायर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांनान 1080 टक्के परतावा कमावून दिला आहे. DP वायर्स कंपनीचे शेअर्स 25 सप्टेंबर 2020 रोजी 57.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 27 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 682 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 1080 टक्क्यांनी मजबूत झाली आहे.
डीपी वायर्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 722 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 590 रुपये होती. मागील 6 महिन्यांत डीपी वायर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 93 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात डीपी वायर्स स्टॉक 64 टक्के वाढला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		