
Dreamfolks Share Price | बीएसईवर ड्रीमफोल्क्स कंपनीच्या शेअरमध्ये 3.25 टक्क्यांची घसरण होऊन शेअर 447.60 रुपयांवर आला आहे. ड्रीमफॉक्स सर्व्हिसेसचा स्टॉक अद्यापही थोड्याफार फायद्यात असून लिस्टिंगच्या दिवशी 326 रुपयांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत अजूनही थोडाफार वर ट्रेड करत आहे.
ड्रीमफॉक्स शेअर्सची आजची किंमत :
ड्रीमफॉक्स सर्व्हिसेस कंपनी, विमानतळांसाठी ऑनलाइन सेवा प्रदान करणार्या प्लॅटफॉर्मची निर्मिती करते. हा स्टॉक मंगळवारी शेअरने बाजारात जबरदस्त एन्ट्री मारली होती. पण, दुय्यम बाजारातून या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांचे नफा कमावण्याचे स्वप्न तुटताना दिसत आहे. लिस्टींगच्या दुसऱ्या दिवशी स्टॉकने गुंतवणूकदारांना गोलीगत धोका दिला आहे.
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसईवर शेअरच्या किमतीत 3.25 टक्क्यांची घसरण झाली होती. आणि शेअरची किंमत घसरून 447.60 रुपयांवर आली होती. ड्रीमफॉक्स सर्व्हिसेसचा स्टॉक अद्यापही फायद्यात ट्रेड करत आहे. लिस्टिंगच्या दिवशी शेअर 326 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत होता. ज्या गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये शेअरचे वितरण करण्यात आले होते त्यांनी फक्त लिस्टिंगच्या दिवशीच चांगला नफा कमावला.
लिस्टिंगच्या दिवशी ड्रीमफॉक्स सर्व्हिसेसची कामगिरी :
ड्रीमफॉक्स सर्व्हिसेसचे शेअर्स लिस्टिंगच्या दिवशी 326 रुपयांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत 42 टक्क्यांनी वाढले होते. कंपनीचा शेअर बीएसईवर 505 रुपयांच्या किमतीवर लिस्ट झाला होता. आता शेअर त्याच्या इश्यू किमतीपेक्षा 54.90 टक्क्यांपेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहे. यानंतर शेअरमध्ये 68.71 टक्क्यांनी वाढ झाली आणि तो वाढून 550 रुपयांच्या किमतीवर पोहोचला होता.
लिस्टिंग नंतर शेअर 41.91 टक्क्यांच्या वाढीसह 462.65 रुपये किमतीवर ट्रेड झाला आणि दिवसाखेर याच किमतीवर बंद झाला होता. पुढील ट्रेडिंग सेशनमध्ये, नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर, कंपनीचा शेअर 56 टक्क्यांच्या वाढीसह 508.70 रुपयांवर व्यवहार करत होता. गुंतवणूकदारांना ह्यात सुरुवातीच्या काळात थोडा नफा झाला, पण पुढील काळात हा स्टॉक किती परतावा देईल, याबाबत शंका आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.