DroneAcharya AI IPO | आला रे आला IPO आला! ड्रोन कंपनीचा IPO लाँच होण्यास सज्ज, गुंतवणुकीपूर्वी प्राईस बँड चेक करा

DroneAcharya Al IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असला तर पुढील काही दिवसात तुम्हाला एक सुवर्ण संधी मिळणार आहे. पुणे स्थित एक ड्रोन कंपनी जिचे नाव “ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन” असून ती आपला आयपीओ लाँच करण्यास सज्ज झाली आहे. या कंपनीचा IPO 13 डिसेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. 15 डिसेंबर 2022 पर्यंत गुंतवणूकदार या IPO इश्यूमध्ये गुंतवणूक करू शकतात. ही कंपनी आपल्या IPO द्वारे फ्रेश शेअर्स खुल्या बाजरी विक्री करून 34 कोटी रुपये भांडवल जमा करेल.
IPO शेअरची किंमत :
DroneAcharya Al कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड प्रति शेअर 52-54 रुपये निश्चित करण्यात आली आहे. या कंपनीचे शेअर्स IPO बंद झाल्यावर बीएसई एसएमई एक्सचेंजवर सूचीबद्ध होणार आहेत. कंपनीच्या IPO लॉटचा आकार 2,000 शेअर्स निश्चित करण्यात आला आहे. किरकोळ गुंतवणूकदार 1 लॉटसाठी बोली लावू शकतात. एक लॉटसाठी गुंतवणुकदारांना किमान 1.08 लाख रुपये खर्च करावे लागतील.
शेअरची GMP किंमत :
या कंपनीचे शेअर्स सध्या ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. शेअर सध्या ग्रे मार्केटमध्ये 25 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड करत आहेत. जीएमपी ट्रेडिंग किंमत ही अशी प्रीमियम किंमत असते, ज्यावर आयपीओ स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध होण्यापूर्वी अनौपचारिक बाजारात ट्रेड करत असतात.
कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
DroneAcharya Al ही कंपनी मल्टी-सेन्सर ड्रोन सर्वेक्षणांसाठी ड्रोन सोल्यूशन्सचा इकोसिस्टम प्रदान करते. या कॉन्फिगरेशनमध्ये वर्कस्टेशन, ड्रोन पायलट प्रशिक्षण आणि विशेष GIS प्रशिक्षण आणि ड्रोन डेटा प्रोसेसिंग याचा समावेश होतो. या कंपनीला भारतीय नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन म्हणून ड्रोन प्रशिक्षण देण्यासाठी अधिकृत संस्था म्हणून नेमले आहे. मार्च 2022 पासून या कंपनीने 180 पेक्षा जास्त ड्रोन वैमानिकांना प्रशिक्षण दिले आहे. ही स्टार्टअप कंपनी IPO मधून जमा होणारी रक्कम ड्रोन, सेन्सर्स प्रक्रिया, पायाभूत सुविधा खरेदी आणि तयार करण्यासाठी खर्च करणार आहे. याशिवाय ही कंपनी मार्च 2023 पर्यंत पूर्ण देशात 12 नवीन प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्याची तयारी करत आहे. ड्रोन आचार्य कंपनीने मे 2022 या महिन्यात प्री-सीड फंडिंग फेरीत 4.6 दशलक्ष डॉलर्स संकलित केले होते. ही ड्रोन कंपनी आपल्या एकूण उत्पन्नापैकी 71.56 टक्के महसूल महाराष्ट्रातील ग्राहकांकडून कमवते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| DroneAcharya AI IPO is ready launch in SME market soon on 07 December 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA