
DroneAcharya Share Price | ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स लिमिटेड कंपनीने गौतम अदानी समुहाच्या कंपनीसोबत मोठा करार केल्याची बातमी येत आहे. मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या घसरणीसह 142.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स लिमिटेड कंपनी अंश )
आज देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले आहे. आज बुधवार दिनांक 13 मार्च 2024 रोजी ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 10.27 टक्के घसरणीसह 129.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
नुकताच ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स लिमिटेड कंपनीकडून अदानी समूह DGCA प्रमाणित ड्रोन पायलट प्रशिक्षणासंबंधित सेवा घेणार आहे. यापुढे अदानी समूह आपल्या विविध व्यवसायांमध्ये मॅपिंग, देखरेख आणि तपासणीच काम करण्यासाठी ड्रोन वापरण्याचा विचार करत आहे.
ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स लिमिटेड कंपनीने आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, “अदानी समुहासारख्या दिग्गज कंपनीने ड्रोनचा वापर करणे म्हणजे लक्षणीय बाब आहे. यामुळे अनेक व्यापारी कंपन्यांना ड्रोन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची प्रेरणा मिळेल”.
नुकताच ड्रोन आचार्य कंपनीला भारताच्या संरक्षण मंत्रालयाने ड्रोन प्रशिक्षण सेवा देण्याचे कंत्राट दिले होते. हा करार फर्स्ट पर्सन व्ह्यू ड्रोनचे वाढते महत्त्व आणि भारतीय लष्कराने आपल्या विविध मिशनसाठी ड्रोनचा वापर वाढवल्याचे संकेत देत आहे. 15 दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात ड्रोन आचार्य कंपनी पायलटला सिम्युलेटर प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक ऑन-ग्राउंड ड्रोन उड्डाण यांचे प्रशिक्षण देणार आहे.
ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन लिमिटेड कंपनीचा IPO डिसेंबर 2022 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. कंपनीने आपल्या IPO मध्ये 54 रुपये इश्यू किंमत निश्चित केली होती. 23 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 90 टक्के प्रीमियम वाढीसह सूचीबद्ध झाले होते. या कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग किंमत 102 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.