 
						Dynamic Cables Share Price | डायनॅमिक केबल्स या वायर आणि केबल्स बनवणाऱ्या कंपनीने मागील 3 वर्षांत आपल्या.गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर प्रॉफिट कमावून दिला आहे. डायनॅमिक केबल्स कंपनीचे शेअर्स मागील 3 वर्षांत 21 रुपयेवरून वाढून 375 रुपयेवर पोहचले आहेत. डायनॅमिक केबल्स कंपनीच्या शेअर्सनी अवघ्या तीन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1600 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Dynamic Share Price)
डायनॅमिक केबल्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 376.95 रुपये होती. डायनॅमिक केबल्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किमंत 104.45 रुपये होती. आज बुधवार दिनांक 12 जुलै 2023 रोजी डायनॅमिक केबल्स कंपनीचे शेअर्स 2.49 टक्के वाढीसह 368.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
3 वर्षांत 1 लाखावर 17 लाख परतवा :
12 जून 2020 रोजी डायनॅमिक केबल्स कंपनीचे शेअर्स 21.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 11 जुलै 2023 रोजी डायनॅमिक केबल्स कंपनीचे शेअर्स 375 रुपये किमतीवर पोहचले होते. या कालावधीत डायनॅमिक केबल्स कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 1600 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 12 जून 2020 रोजी डायनॅमिक केबल्स कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 17.40 लाख रुपये होते.
1 वर्षात 231 टक्के परतावा :
मागील एका वर्षात डायनॅमिक केबल्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 169.99 टक्के परतावा कमावून दिला आहे. 11 जुलै 2022 रोजी डायनॅमिक केबल्स कंपनीचे शेअर्स 111.35 रुपयेवर ट्रेड करत होते. डायनॅमिक केबल्स कंपनीचे शेअर्स 11 जुलै 2023 रोजी 375 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. डायनॅमिक केबल्स कंपनीच्या शेअर्सनी मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 81.67 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील एका महिन्यात डायनॅमिक केबल्स कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 38.54 टक्के परतावा कमावून दिला आहे. 12 जून 2023 रोजी हा स्टॉक 260.30 रुपयेवर ट्रेड करत होता, तर 11 जुलै रोजी शेअरची किंमत 375 रुपयेवर पोहोचली होती. आज 12 जुलै रोजी शेअर 368.80 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		