
Edvenswa Enterprises Share Price | ‘एडवेन्सवा एंटरप्रायझेस’ या आयटी सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. आज मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी ‘एडवेन्सवा एंटरप्रायझेस’ या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इंडेक्सवर 4.99 टक्के अप्पर सर्किटसह 49.89 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरमध्ये अचानक वाढ होण्याचे कारण म्हणजे कंपनीला स्ट्रॅटेजिक रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन विभागात एक नवीन प्रकल्प मिळाला आहे. ‘एडवेन्सवा एंटरप्रायझेस’ कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळत आहे. ‘एडवेन्सवा एंटरप्रायझेस’ कंपनीची उपकंपनी ‘एडवेन्सवा टेक’ ने ‘बिगफोन कन्सल्टिंग’ कंपनीकडून हा प्रोजेक्ट घेतला आहे. (Edvenswa Enterprises Limited)
‘एडवेन्सवा एंटरप्रायझेस’ कंपनीचे शेअर्स मागील 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीत 538 टक्के वाढले आहेत. 4 जून 2021 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इंडेक्सवर ‘एडवेन्सवा एंटरप्रायझेस’ कंपनीचे शेअर्स 7.44 रुपये किंमतीवर ट्रेड करत होते. 10 एप्रिल 2023 रोजी या आयटी कंपनीचे शेअर्स 47.52 रुपये किमतीवर पोहोचले होते. दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत ‘एडवेन्सवा एंटरप्रायझेस’ कंपनीच्या शेअरची किंमत 538 टक्के वाढली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 75.79 रुपये होती. तर ‘एडवेन्सवा एंटरप्रायझेस’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 18.65 रुपये होती.
शेअरची कामगिरी :
अवघ्या 1 वर्षात ‘एडवेन्सवा एंटरप्रायझेस’ या कंपनीच्या शेअर्सची किंमत 167.51 टक्के वाढली आहे. 11 एप्रिल 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इंडेक्सवर IT सेवा प्रदान करणाऱ्या ‘एडवेन्सवा एंटरप्रायझेस’ कंपनीचे शेअर्स 18.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 10 एप्रिल 2022 रोजी BSE इंडेक्सवर ‘एडवेन्सवा एंटरप्रायझेस’ कंपनीचे शेअर्स 47.52 रुपये किमतीवर पोहचले होते. मात्र या वर्षी कंपनीच्या शेअरमध्ये 3.16 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरची किंमत 1.67 टक्के वाढली आहे. तर ‘एडवेन्सवा एंटरप्रायझेस’ कंपनीचे एकूण बाजार भांडवल 86.30 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.