
Eicher Motors Share Price | भारतातील प्रसिद्ध बुलेट मोटर सायकल बनवणाऱ्या आयशर मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना छप्पर एफड परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सने आतापर्यंत आपल्या शेअर धारकांना 53000 टक्के पेक्षा जास्त नफा मिळवून दिला आहे.
शेअर्सची 52 आठवड्यांची पातळी
आयशर मोटर्स कंपनीचे शेअर्स 7 रुपयेवरून वाढून 3700 रुपयेवर गेले आहेत. आयशर मोटर्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 3886 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 2585.30 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 8 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.22 टक्के घसरणीसह 3,681.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 लाखाचे झाले 5 कोटी
आयशर मोटर्स कंपनीचे शेअर्स 26 जून 2002 रोजी 6.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 7 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3714.35 रुपये किमतीवर पोहचले होते. आयशर मोटर्स कंपनीच्या शेअर्सनी या कालावधीत आपल्या गुंतवणुकदारांना 53037 टक्के नफा मिळवून दिला आहे. जर तुम्ही 26 जून 2002 रोजी आयशर मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5.31 कोटी रुपये झाले असते.
गुंतवणूकीवर परतावा
आयशर मोटर्स कंपनीच्या शेअर्सनी मागील 15 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 13407 टक्के नफा कमावून दिला आहे. 6 जून 2008 रोजी या कंपनीचे शेअर्स 27.51 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 7 जून 2023 रोजी आयशर मोटर्स कंपनीचे 3714.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
जर तुम्ही 15 वर्षांपूर्वी आयशर मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.35 कोटी रुपये झाले असते. आयशर मोटर्स कंपनीचे शेअर्स मागील 10 वर्षांत 945 टक्के मजबूत झाले आहेत.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.