16 December 2024 12:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

EIL Share Price | शेअर असावा तर असा! यापूर्वी 175% परतावा देणारा शेअर आता अल्पावधीत 23 टक्के परतावा देईल

EIL Share Price

EIL Sharie Price | इंजिनियर्स इंडिया लिमिटेड या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5.5 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआय डायरेक्टने या सरकारी कंपनीच्या शेअरवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. ( इंजिनियर्स इंडिया लिमिटेड कंपनी )

मागील 2 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 200 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 27 मार्च 2024 रोजी इंजिनियर्स इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.74 टक्के घसरणीसह 200.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ब्रोकरेज हाऊस ICICI Direct ने इंजिनियर्स इंडिया कंपनीचे शेअर 240 रुपये या टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 22 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर 196 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. म्हणजेच सध्याच्या किंमत पातळीच्या तुलनेत हा स्टॉक 23 टक्क्यांनी वाढू शकतो. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 175 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 210 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 45 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 27 टक्क्यांनी मजबूत झाली आहे.

इंजिनियर्स इंडिया लिमिटेड ही नवरत्न दर्जा असलेली सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी अभियांत्रिकी सल्लामसलत आणि टर्नकी विभाग संबंधित व्यवसाय करते. ही कंपनी मध्य पूर्व, आफ्रिका, दक्षिण आशिया आणि मध्य आशिया सारख्या बाजारपेठांमध्ये देखील व्यवसाय करते. आर्थिक वर्ष 2023 मध्ये या कंपनीने टर्नकी आणि कन्सल्टन्सी सेगमेंटमधून 57 टक्के महसूल संकलित केला होता.

इंजिनियर्स इंडिया लिमिटेड कंपनीने रसायने, खते, धातू, उर्जा आणि इन्फ्रा विभागातून 43 टक्के महसूल संकलित केला होता. विद्यमान करारांची अंमलबजावणी आणि देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मजबूत ऑर्डर पाइपलाइनमुळे या कंपनीच्या कमाईत मजबूत वाढ होऊ शकते.

इंजिनियर्स इंडिया लिमिटेड ही कंपनी ग्रीन हायड्रोजन, अमोनिया, जैव-इंधन, कोळसा कॅल्सिफिकेशन, संरक्षण यांसारख्या विभागांतील व्यवसाय वाढीवर देखील लक्ष केंद्रित करत आहे. कंपनीला पुढील 3-5 वर्षात या विभागामधे मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळू शकतात. आर्थिक वर्ष 2023-25 मध्ये इंजिनियर्स इंडिया लिमिटेड कंपनीची आर्थिक कामगिरी सुधारण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. तज्ञांच्या मते, इंजिनियर्स इंडिया लिमिटेड या सरकारी कंपनीचे शेअर्स 240 रुपये किमतीवर जाऊ शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | EIL Share Price NSE Live 27 March 2024.

हॅशटॅग्स

EIL Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x