 
						Elecon Engineering Share Price | इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीचे जून तिमाहीचे निकाल नुकताच जाहीर झाले आहेत. इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी खुश खबर अशी की, कंपनीची चालू आर्थिक वर्षातील पहिली तिमाही जबरदस्त उत्साहवर्धक ठरली आहे. या तिमाहीत कंपनीने खूप चांगली कामगिरी केली आहे.
जून तिमाहीत इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीच्या PAT मध्ये वार्षिक आधारावर 72 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. जून तिमाहीची बातमी जाहीर होताच गुंतवणूकदारांनी इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स खरेदी करायला सुरुवात केली. आज बुधवार दिनांक 12 जुलै 2023 रोजी इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 1.08 टक्के वाढीसह 729.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 18 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. उत्कृष्ट तिमाही निकाल पाहिल्यानंतर गुंतवणूकदारानी देखील मोठ्या प्रमाणात पैसे लावायला सुरुवात केली आहे. इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीने जून 2023 तिमाहीमध्ये 73 कोटी रुपये PAT कमावला आहे. मागील वर्षीच्या जून 2023 तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीत कंपनीने 72 टक्के अधिक PAT कमावला आहे.
एप्रिल ते जून 2023 या तिमाही दरम्यान इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीने 414 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. वार्षिक आधारावर कंपनीच्या महसूल संकलनात 26 टक्के अधिक वाढ नोंदवली गेली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरची किंमत 18.39 टक्क्यांच्या वाढीसह 749 रुपयेवर पोहोचली होती. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 126.89 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		