24 March 2023 12:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ChatGPT Job Effect | चॅट जीपीटी'मुळे या क्षेत्रातील नोकऱ्यांना प्रचंड धोका, कोणत्या नोकऱ्या सुरक्षित? लिस्ट मध्ये तुमची नोकरी कोणती? Accenture Job Loss | आयटी क्षेत्रात भूकंप, दिग्गज कंपनी अ‍ॅक्सेन्चर 19,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार OnePlus Nord CE 3 Lite 5G | वनप्लसचा 108 MP कॅमेरा असलेला स्वस्त Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन लाँच होणार, किंमत-फीचर्स? Hindenburg Report on Block Inc | अदानींनंतर हिंडनबर्गचा बॉम्ब या उद्योगपती फुटला, शेअर्स 20 टक्क्यांनी कोसळले Numerology Horoscope | 24 मार्च, तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Deep Industries Share Price | या शेअरने 552 टक्के परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिटची घोषणा, स्टॉक स्प्लिटचा फायदा घ्या Sera Investment Share Price | लॉटरीच लागली! गुंतवणुकदारांना 454 टक्के परतावा दिल्यानंतर आता हा शेअर स्प्लिट होतोय
x

EPF on Salary Slip | EPF कॅल्क्युलेटरमध्ये मोजा तुमची ईपीएफ खात्यातील जमा रक्कम, निवृत्तीपूर्वी EPF खात्यात जमा पैशाचा हिशोब

EPF On Salary Slip

EPF on Salary Slip | जेव्हा तुम्ही एखादी नोकरी करता तेव्हा दर महिन्याला तुमच्या पगारातून ठराविक रक्कम EPF खात्यात जमा केली जाते. EPF मधील रक्कम निवृत्तीच्या वेळी तुम्हाला खूप मोठा आर्थिक आधार देऊ शकते. वृद्धापकाळात तुमच्या गरजा आणि जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी ही रक्कम तुम्हाला उपयोगी पडू शकते. तुम्ही नोकरीत असताना ईपीएफमध्ये गुंतवणूक सुरू केल्यास निवृत्तीपर्यंत तुमच्याकडे किती पैसे जमा होती, याचे कुतूहल तुमच्या मनात नक्की निर्माण झाले असेल. तुम्ही कधी तुमच्या EPF फंड मधील रक्कम मोजण्याचा प्रयत्न केला आहे का? नाही? काळजी करू नका. चला तर मग 50 हजार रुपये (बेसिक + DA) पगारावर आपण ईपीएफ मोजण्याचा प्रयत्न करू.

हिशोब समजून घ्या :
समजा तुमचा पगार 50,000 रुपये आहे. तुमचे सध्याचे वय 30 वर्षे आहे असे गृहीत धरू. तुमच्या मूळ पगाराच्या 12 टक्के रक्कम ईपीएफ खात्यात जमा केली जाते. तुमच्या पगारात वार्षिक 5 टक्के वाढ होते. ईपीएफवर तुम्हाला वार्षिक 8.5 टक्के दराने व्याज परतावा मिळतो. या आकडेवारीनुसार तुम्हाला निवृत्तीनंतर किती पैसे मिळतील हे आपण ग्रो ईपीएफ कॅल्क्युलेटरनुसार गणना करू शकतो. निवृत्तीनंतर म्हणजेच तुमच्या वयाच्या 60 व्या वर्षी तुमच्या ईपीएफ खात्यात 2,69,68,591 रुपये जमा होतील.

गणना करताना डेटाचे आकलन महत्त्वाचे आहे :
वरील गणनेमध्ये तुमचे मासिक मूळ वेतन, तुम्ही पीएफमध्ये योगदान देत असलेली रक्कम, तुमचे सेवानिवृत्तीचे वय, तुमची सध्याची ईपीएफ शिल्लक आणि ईपीएफवर लागू होणारा व्याजदर, या सर्व आकड्यांचा समावेश केला आहे. या आधारे निवृत्तीच्या वेळी तुमच्या ईपीएफ खात्यात किती रक्कम जमा होईल, याची अचूक गणना करण्यात आली आहे.

किमान मासिक पेन्शन वाढवण्यावर भर :
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या/EPFO पेन्शन योजने अंतर्गत मिळणारी किमान मासिक पेन्शन रक्कम फक्त 1,000 रुपये आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय कामगार मंत्रालय किमान पेन्शनच्या रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव विचारात घेत आहे. मागील महिन्यात कामगारांसाठी स्थापन करण्यात आलेल्या संसदीय स्थायी समितीने 2022-23 च्या अनुदानाच्या मागण्यांवर संसदेत अहवाल सादर केला होता. या अहवालात असे म्हटले आहे की पूर्वी निश्चित केलेली किमान मासिक पेन्शन रक्कम 1,000 रुपये असून ही खूपच कमी आहे, ज्यात वाढ करणे प्रस्तावित आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| EPF On Salary Slip calculation on EPF Calculator for understanding the amount of EPF at the time of retirement on 26 November 2022

हॅशटॅग्स

EPF On Salary Slip(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x