18 April 2024 10:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | पगारदारांनो! या म्युच्युअल फंड योजना 46 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, येथे पैसा वाढवा SBI Special Scheme | टेन्शन नको! सरकारी SBI बँकेची ही योजना दरमहा पैसे देईल, इतर फायदे सुद्धा मिळतील Numerology Horoscope | 18 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 18 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 4 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 33 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Tinna Rubber Share Price | श्रीमंत करतोय हा शेअर! 3 वर्षात 1 लाख रुपयाच्या गुंवतवणुकीवर दिला 4.42 कोटी परतावा Lorenzini Apparels Share Price | 27 रुपयाच्या शेअरची कमाल, मल्टिबॅगर परताव्यसह स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सचा लाभ
x

FDI in West Bengal | उद्धव ठाकरेंना प्रतिउत्तर देताना फडणवीसांकडून बंगाल उद्योग क्षेत्रासंबंधित खोटी माहिती

FDI in West Bengal

मुंबई, 16 ऑक्टोबर | शिवसेनेचा दसरा मेळावा काल मुंबईत पार पडला. या मेळाव्यादरम्यान बोलत असताना शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलीच फटकेबाजी करत विरोधकांवर निशाणा साधला. या सगळ्यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली (FDI in West Bengal) आहे.

FDI in West Bengal. The reply is that no industry has survived in Bengal due to ransom. However, the fact check has revealed that Fadnavis is completely wrong that no industry has survived in Bengal due to ransom :

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, “मुख्यमंत्री म्हणाले की आम्हाला महाराष्ट्राचा बंगाल करायचाय, म्हणजे नक्की काय करायचंय? खंडणीबाजीमुळे बंगालमध्ये एकही उद्योग टिकलेला नाही असं सांगत प्रतिउत्तर दिलं आहे. मात्र खंडणीबाजीमुळे बंगालमध्ये एकही उद्योग टिकलेला नाही हा फडणवीसांचा पूर्णपणे चुकीचा असल्याचं फॅक्टचेक मध्ये समोर आलं आहे.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारताने 2020-21 या आर्थिक वर्षात 81.72 अब्ज डॉलर्सचा सर्वाधिक एफडीआय (परकीय थेट गुंतवणूक) आकर्षित केला आहे. राज्यांमध्ये, गुजरातला सर्वाधिक परकीय गुंतवणूक एकूण इक्विटी फ्लोच्या 37 टक्के प्राप्त झाली. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये अनुक्रमे दुसरा आणि तिसरा इक्विटी फ्लो 27 टक्के आणि 13 टक्के होता.

महाराष्ट्राने 1.53 लाख कोटी एफडीआय आकर्षित केली, तर कर्नाटक 78,160 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह तिसऱ्या स्थानावर आहे. दिल्लीने चौथे स्थान मिळवले आणि एप्रिल-डिसेंबर कालावधीत 59,830 कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणूक आकर्षित केली. पश्चिम बंगाल 4,309 कोटी रुपये गुंतवणुकीसह देशात ९व्या क्रमांकावर आहे आणि उत्तर प्रदेश 4,103 कोटीची परकीय गुंतवणूक आली असून त्यांचा देशात १०वा क्रमांक आहे.

FDI-in-West-Bengal

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: FDI in West Bengal 2021 22 misguiding information from Devendra Fadnavis.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x