 
						Federal Bank Share Price | मागील काही आठवड्यांपासून लाल निशाणीवर ट्रेड करणाऱ्या फेडरल बँकेच्या शेअर्सने काल फ्रेश ब्रेक आऊट तोडला होता. फेडरल बँकेचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात NSE इंडेक्सवर 142.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज फेडरल बँकेचे शेअर्स 135 ते 139 रुपये या किमतीच्या दरम्यान लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत. फेडरल बँकेचे शेअर 137.30 रुपये किमतीवर कमजोरीसह ओपन झाले आहेत.
स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
शेअर बाजारातील तज्ज्ञांनी फेडरल बँकेच्या शेअरमध्ये अप ट्रेंड सुरू होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आणि लवकरच हा स्टॉक 155 रुपये ते 158 रुपयेपर्यंत वाढू शकतो. स्टॉक मध्ये तेजीचे संकेत मिळत असून गुंतवणूकदारानी हा बँकिंग स्टॉक 165 रुपयेच्या मध्यम मुदतीच्या लक्ष्यासह खरेदी करावा, आणि 190 रुपयेच्या दीर्घकालीन लक्ष्यासह स्टॉक होल्ड करावा. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार स्टॉकमध्ये अप हाय आणि लो हाय फॉर्मेशनच्या निर्मितीनंतर 140 रुपयेचा फ्रेश ब्रेकआउट पाहायला मिळाला आहे.
फेडरल बँक शेअरबाबत दृष्टिकोन :
IIFL सिक्युरिटीजचे तज्ञ या स्टॉकबाबत म्हणतात की,” फेडरल बँकेच्या शेअरने चार्ट पॅटर्नवर 140 रुपये किमतीवर फ्रेश ब्रेकआउट दर्शवला आहे. हा ब्रेकआउट पुढील काळात स्टॉकमध्ये जबरदस्त चढ-उतार येण्याचे संकेत देत आहे. दैनंदिन चार्ट पॅटर्नवर स्टॉक ची कामगिरी ठीकठाक आहे, म्हणून ज्यांच्या पोर्टफोलिओमध्ये हा स्टॉक आहे त्यांनी अल्प मुदतीसाठी 155 रुपये ते 158 रुपये प्रति शेअर लक्ष किमटीसाठी स्टॉक होल्ड करावा, असा सल्ला तज्ञ देतात. ज्यांनी दीर्घकालीन दृष्टीकोन ठेऊन गुंतवणूक केली आहे, ते शेअर पडत्या किमतीवर खरेदी करू शकता. तज्ञाना हा बँकिंग शेअर दीर्घ काळात 190 रुपये प्रति शेअर किमतीवर जाताना दिसतो”. तथापि स्टॉक मार्केट तज्ञ फेडरल बँकेच्या शेअर धारकांना 118 रुपये प्रति शेअर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला देत आहेत.
राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक :
मागील तिमाहीत जाहीर केलेल्या फेडरल बँकेच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार जुलै ते सप्टेंबर 2022 तिमाहीमध्ये राकेश झुनझुनवाला यांनी फेडरल बँकेचे 5,47,21,060 शेअर्स होल्ड केले आहेत. झुनझुनवाला फेडरल बँकेच्या एकूण पेडअप कॅपिटलच्या 2.63 टक्के शेअर्सचे मालक आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		