 
						Federal Bank Share Price | फेडरल बँक स्टॉक गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीच्या जवळ ट्रेड करत होते. तर आज या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळाली आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फेडरल बँकेच्या शेअर्सनी 159.25 रुपये ही सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती.
मात्र दिवसा अखेर या स्टॉकमध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळाली, आणि शेअर 2.76 टक्के घसरणीसह 153.10 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी फेडरल बँक स्टॉक 0.23 टक्के घसरणीसह 153.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
शेअर बाजारातील दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा राकेश झुनझुनवाला यांनी फेडरल बँकेचे 4.82 कोटी शेअर्स म्हणजेच जवळपास 2.01 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. तर राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये फेडरल बँकेचे 2.45 कोटी शेअर्स म्हणजेच जवळपास 1.02 टक्के स्टेक आहेत. फेडरल बँकेच्या प्रवर्तकांनी आपली शेअर होल्डिंग शून्य केली आहे.
मागील एका वर्षात फेडरल बँकेच्या शेअरने गुंतवणूकदारांना 15 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर 2023 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतपर्यंत या बँकेचे शेअर्स 11 टक्के वाढले आहेत. ब्रोकरेज फर्म निर्मल बंगच्या मते, फेडरल बँकेचे शेअर्स पुढील काळात 182 रुपये किमतीवर जाऊ शकतात.
ब्रोकरेज फर्मने फेडरल बँकेचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. ब्रोकरेज फर्म शेअरखानने फेडरल बँकेच्या शेअरवर 170 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली होती. तर आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मने देखील या बँकेच्या शेअरवर 175 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे.
फेडरल बँकेने सप्टेंबर 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत जबरदस्त कामगिरी केली आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या सप्टेंबर तिमाहीत या बँकेने 703.7 कोटी रुपये नफा कमावला होता. तर या वर्षीच्या सप्टेंबर तिमाहीत फेडरल बँकेने 35.56 टक्के वाढीसह 954 कोटी रुपये नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत फेडरल बँकेने 1761.18 कोटी रुपये निव्वळ व्याज उत्पन्न कमावले होते. जे आता 16.7 टक्के वाढीसह 2056.4 कोटी रुपयेवर पोहचले आहेत.
सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत फेडरल बँकेतील 1.89 लाख कोटी रुपयेच्या तुलनेत सप्टेंबर 2023 तिमाहीत बँकेच्या ठेवी 23 टक्के वाढीसह 2.32 लाख कोटी रुपयेवर पोहोचल्या आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत फेडरल बँकेच्या ठेवी 1.89 लाख कोटी रुपये होत्या, ज्या 5 टक्के वाढल्या आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		