
Federal Bank Share Price | राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या फेडरल बँक स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या बँकेचे शेअर्स मंगळवारी 5.4 टक्के वाढीसह 203.40 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. ( फेडरल बँक अंश )
आज देखील हा स्टॉक तेजीत वाढत आहे. नुकताच या बँकेच्या शेअर्सने 200 रुपयेचा टप्पा पार केला आहे. नुकताच RBI ने कृष्णन वेंकट सुब्रमण्यम यांना फेडरल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून मान्यता दिल्यानंतर फेडरल बँक स्टॉक तेजीत आला होता. आज बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी फेडरल बँक स्टॉक 1.42 टक्के वाढीसह 200.78 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये फेडरल बँकेचे 3.83 कोटी शेअर्स आहेत. तसेच रेखा राकेश झुनझुनवाला यांच्याकडे मार्च 2024 तिमाहीपर्यंत फेडरल बँकेचे 3.83 कोटी शेअर्स होते. मागील आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीतील शेअरहोल्डिंग डेटानुसार राकेश झुनझुनवाला यांच्या नावावर फेडरल बँकेचे एकूण 1.02 टक्के स्टेक होते. या बँकेचे एकूण बाजार भांडवल 48,786 कोटी रुपये आहे. या बँकिंग स्टॉकचा एक वर्षांचा बीटा 0.9 आहे, जो या कालावधीत कमी अस्थिरता दर्शवतो.
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, फेडरल बँक स्टॉकने 193 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तर या स्टॉकला 197 रुपये किमतीवर जबरदस्त रेझिस्टन्स मिळत आहे. जर हा स्टॉक 197 रुपये किमतीच्या वर टिकला तर शेअर अल्पावधीत 203 रुपयेवर जाऊ शकतो. आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर फर्मच्या मते, फेडरल बँक स्टॉकची अपेक्षि ट्रेडिंग रेंज 185 रुपये ते 208 रुपये दरम्यान असेल.
तज्ञांच्या मते, मध्यम मुदतीत हा स्टॉक 220 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. मार्च तिमाहीमध्ये फेडरल बँकेचा नफा मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 903 कोटी रुपयेवरून 0.4 टक्क्यांनी वाढून 906 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. या तिमाहीत बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न वार्षिक आधारावर 909 कोटी रुपयेवरून 14.97 टक्क्यांनी वाढून 2,195 कोटी रुपये नोंदवले गेले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.