
Stock To Buy| जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून पैसे कमावण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही या लेखात तुम्हाला ज्या बँकिंग स्टॉक बद्दल माहिती देणार आहोत, त्यावर फोकस असू द्या. शेअर बाजारात गुंतवणूक करणारे आणि आर्थिक सल्ला देणारे ब्रोकरेज फर्म या बँकिंग स्टॉकबाबत अतिशय सकारात्मक असून आपल्या ग्राहकांना त्यांनी हा स्टॉक आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडण्याचा सल्ला दिला आहे.
खरेदी योग्य शेअर :
मागील काही काळात बँकिंग स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमवून दिला आहे. आज आपण ज्या बँकिंग स्टॉक बद्दल चर्चा करणार आहोत, त्याचे नाव आहे, “फेडरल बँक”. फेडरल बँकेचे शेअर्स आजकाल 122.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. प्रभुदास लिलाधर या गुंतवणूक फर्मने फेडरल बँकेच्या शेअर्सला ‘बाय रेटिंग’ दिले असून आपल्या ग्राहकांना स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. स्टॉक पुढील काळात 135 रुपये किमतीवर जाऊ शकतो असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
शेअर मार्केट ब्रोकर्सचे मत :
प्रभुदास लिलाधर या ब्रोकर हाऊसने नुकताच आपल्या अहवालात एक अंदाज व्यक्त केला आहे की, फेडरल बँकेचे शेअर्स पुढील येणाऱ्या काळात 135 रुपये लक्ष्य किंमतीपर्यंत जाऊ शकतात. सध्याच्या ट्रेडिंग किमतीच्या तुलनेत येणाऱ्या काळात हा स्टॉक 9.98 टक्के पर्यंत वर जाऊ शकतो. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये फेडरल बँकचा शेअर 8.72 टक्के वाढला आहे. त्याच वेळी,चालू वर्षात दर वार्षिक वाढ प्रमाणे फेडरल बँकच्या शेअरमध्ये 40.77 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.
फेडरल बँकबद्दल थोडक्यात :
फेडरल बँक लिमिटेडची स्थापना 1931 साली झाली होती. सध्या फेडरल बँकेचे बाजार भांडवल 25210.56 कोटी रुपये आहे. 30 जून 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत, फेडरल बँकने 4318.17 कोटी रुपये एकत्रित महसूल कमावला आहे जे त्यापूर्वीच्या तिमाहीत कमावलेल्या महसुलाच्या तुलनेत 3.31 टक्के अधिक होते. जून पूर्वीच्या तिमाहीत बँकेने एकूण 4170.55 कोटी रुपये कमावले होते. गेल्या वर्षी तिसऱ्या तिमाहीतील फेडरल बँकेचे एकूण उत्पन्न महसूल 4147.77 कोटी रुपयेवरून 4.11 टक्के अधिक वाढले आहे. सध्याच्या चालू तिमाहीत फेडरल बँकेने 634.22 कोटी निव्वळ नफा कमावला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.